Agriculture news in marathi Rabbi in danger from cloudy atmosphere in Khandesh | Agrowon

खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे ग्रहण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. मध्यंतरी दोन दिवस थंडी होती. आता पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. 

धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद पाच अंश सेल्सिअसपर्यंत झाली होती. तर, जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद १२ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे.

जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-चार दिवसांचा अपवाद वगळता पडलेली नाही. मध्यंतरी दोन दिवस थंडी होती. आता पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. 

धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद पाच अंश सेल्सिअसपर्यंत झाली होती. तर, जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद १२ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे.

मागील मोसमात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे चांगले उत्पादनही हाती आले होते. सिंचनासाठी पाण्याची गरजही कमी झाली होती. परंतु, यंदा मात्र किमान तापमान फक्त धुळे जिल्ह्यात काही दिवस पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. जळगाव जिल्ह्यात मात्र किमान तापमान या मोसमात आतापर्यंतदेखील आठ अंश सेल्सिअसखाली आलेले नाही. मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. थंडी मागील दोन दिवसांत कमी झाली. तापमान घसरू लागताच शेतकऱ्यांनी केळीच्या थंडीपासून बचावासाठी व्यवस्थापन हाती घेतले होते.

ज्वारी, हरभरा, गव्हासाठी थंडीची गरज

हरभरा, ज्वारी, उशिरा पेरणीचा गहू आदी पिकांसाठी थंडी अधिक हवी आहे. ती किमान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत टिकून राहावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या बुधवारी (ता. १५) मकर संक्रांतीचा सण होता. यानंतर थंडी वाढली होती. नंतर पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. अशीच स्थिती राहिली, तर थंडी आणखी कमी होत जाईल. यामुळे रब्बी पिके हवी तशी येणार नाहीत. यातच मका, ज्वारीवर अनेक भागांत लष्करी अळी दिसत आहे. अधिक थंडी असली, तर ही अळी आटोक्‍यात येऊ शकते, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...