अनियमित वीजपुरवठ्याने नांदेड जिल्ह्यात रब्बी धोक्यात

नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बीच्या हंगामावर पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, रब्बीच्या हंगामात आता पिकांना पाणी देणे सुरु करण्याच्या वेळेलाच विद्युत पुरवठा नियमित केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Rabbi in danger in Nanded district due to irregular power supply
Rabbi in danger in Nanded district due to irregular power supply

नांदेड : खरिपाचा हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बीच्या हंगामावर पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, रब्बीच्या हंगामात आता पिकांना पाणी देणे सुरु करण्याच्या वेळेलाच विद्युत पुरवठा नियमित केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

यावर्षी सुरुवातीपसूनच चांगला पऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपामध्ये भरघोस उत्पादन घेता येईल, अशी आशा होती. मात्र, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिके फुले, कळ्यांच्या स्थितीत असताना पावसाने सतत हजेरी लावली. त्यामुळे पिकांची मोठी नासाडी झाली. त्याचबरोबर कापणीच्या तोंडावर पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली. तब्बल १५ दिवसांवर पावसाने सतत मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे कापणी करून ठेवलेले सोयाबीनचे पीक होत्याचे नव्हते झाले. त्यातच बाजारात सोयाबीनचे भावही अर्ध्यावर येऊन ठेपले. 

परिणामी, लागवडीचा खर्चही निघणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले. असे असताना पुन्हा रब्बीच्या हंगामावर शेतकऱ्यांनी लक्ष दिले. सततच्या पावसाने तणाने पडीक झालेल्या जमिनी तयार करून त्यामध्ये आता पेरणी झाली आहे. उगवलेल्या पिकांना आता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी देण्याचे काम करत आहेत. मात्र, अवघ्या आठ ते दहा दिवसांतच महावितरण कंपनीच्या वतीने अनेक भागात वसुलीचा तगादा लावला आहे. 

प्रतिकनेक्शन तीन ते पाच हजार रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी कमी होल्टेजचा विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे. पेरणी केलेले बियाणे या पाण्याअभावी उगविण्यास बाधा निर्माण होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com