Agriculture News in Marathi Rabbi on fifteen thousand hectares Safflower oilseed production, processing project | Page 2 ||| Agrowon

रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई तेलबिया उत्पादन, प्रक्रिया प्रकल्प 

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने या रब्बी हंगामात महाज्योतीमार्फत विदर्भात काही प्रमुख जिल्ह्यांत करडई तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प सुमारे १५ हजार हेक्टरवर राबवला जात आहे.

अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने या रब्बी हंगामात महाज्योतीमार्फत विदर्भात काही प्रमुख जिल्ह्यांत करडई तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प सुमारे १५ हजार हेक्टरवर राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी काढलेले उत्पादन हमी भावाने परत घेण्याची तरतूद करण्यात आल्याने या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. 

सध्या तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात मोठी संधी मानली जाते. शासनाच्या खाद्यतेल धोरणाला अनुसरून नागपूर येथील महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलेअर गटातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प हातात घेण्यात आला. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे तीन क्लस्टर तयार करून त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्राने एक सविस्तर प्रकल्प बनवला. शेतकऱ्यांना पीक उत्पादन ते विक्री, प्रक्रिया या टप्प्यांवर जे काही प्रश्‍न उद्‍भवतात, ते सोडवीत या प्रकल्पाची रचना करण्यात आली. कृषी विद्यापीठ पीक उत्पादनाबाबतचे तांत्रिक ज्ञान, प्रक्रीया शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून पोहोचवीत आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञही शेतकऱ्यांच्या बैठका घेत मार्गदर्शन करीत आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाला तर देशात आयडियल व पायलट स्केलवर ही पद्धत सुरू होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. 

जीआय प्रोत्साहनासाठी स्वतंत्र योजना 
निर्यातवाढीसाठी राज्यातील विविध २४ पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाला आहे. या उत्पादनांच्या प्रभावी विपणन आणि निर्यातीसाठी पणन मंडळाने स्वतंत्र योजना आखली आहे. यामध्ये संबधित पिकाचे ब्रॅण्डिंग, पॅकिंग, विपणन यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती निर्यात विभाग प्रमुख सतीश वराडे यांनी सादर केली. 

...अशी आहे योजना 
करडई पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन 
सहभागी शेतकऱ्यांना महाज्योती मार्फत मोफत बियाणे पुरवठा, इतर कामांसाठी डीबीटीद्वारे एकरी २२०० रुपये थेट खात्यात 
यंत्रांच्या साह्याने करडईची काढणी 
उत्पादित माल हमीभावाने खरेदीची खात्री 
करडईची खरेदी, वाहतूक, साठवण, तेल काढणे, ग्रेडिंग, पॅकेजिंग महाज्योती करणार 
उत्पादित तेलविक्रीतून होणारा निव्वळ नफाही सहभागी शेतकऱ्यांना त्यांनी पुरविलेल्या मालानुसार देणार 

प्रतिक्रिया... 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्राने या प्रकल्पासाठी तांत्रिक माहिती, बियाणे उपलब्धता करून देणे, शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, महाज्योतीने हा प्रकल्प कसा राबवायचा, प्रक्रिया उद्योग उभारणी, अशा विविधस्तरावर काम केले आहे. शास्त्रज्ञ, कृषी विभागामार्फत विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. 
- डॉ. संतोष गहूकार, तंत्रज्ञ सल्लागार व नोडल ऑफिसर 
करडई तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प, तथा विभागप्रमुख, तेलबिया संशोधन केंद्र, अकोला  

 

 
 


इतर बातम्या
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...
शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या...शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...