कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी

कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी
कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी

कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.  चालू वर्षी नवीन आडसाली हंगामात आतापर्यंत १७८८० हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागण झाली आहे. पूर्व हंगामी लागणीची कामे सुरू आहेत. आतापर्यंत २७३२३ हेक्‍टर लागणीची नोंद झालेली आहे. तसेच, उसाची एकूण २४०३ हेक्‍टर लागण झाली आहे. मध्यंतरी लागणीची कामे खोळांबली होती ती आता सुरू झाली असल्याची माहिती श्री. वाकुरे यांनी दिली. जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ऊस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र १४२३३६ हेक्‍टर आहे. सन २०१८-१९ मधील लागण झालेला ऊस काढणीसाठी तयार झाला असून गळीत हंगामास सुरुवात झालेली आहे. आजतागायत उसाचा खोडवा १३९६५ हेक्‍टर इतका असल्याचेही श्री. वाकुरे यांनी सांगितले. गेल्यावर्षी झालेल्या महापूर व त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी १ लाख ५५ हजार ५८४ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस पीक होते, यापैकी केवळ ५९ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रातीलच ऊस गाळपास उपलब्ध झाला आहे. जवळपास ९६ हजार हेक्‍टर क्षेत्रातील ऊस पीक वाया गेले आहे. रब्बी हंगामतील पिकांचे क्षेत्र असे (आकडे हेक्‍टरमध्ये) रब्बी ज्वारी - ९२२१ हेक्‍टर, गहू- ८७१, मका - १४१३, हरभरा- ४१४३, तंबाखू- ४५६, भाजीपाला- १९०३, चारा पीक- २९०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com