Agriculture news in marathi, Rabbi in Nagar district Less percentage of sowing | Agrowon

नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

नगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा वेग येताना दिसत नाही. बऱ्याच पिकांच्या पेरणीचा कालावधी संपला आहे. आतापर्यंत केवळ २३ टक्के पेरणी झाली आहे.

नगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा वेग येताना दिसत नाही. बऱ्याच पिकांच्या पेरणीचा कालावधी संपला आहे. आतापर्यंत केवळ २३ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीसह मका, गहु, हरभऱ्याची पेरणीही अल्पच आहे. रब्बी पिकांचे घटते क्षेत्र कांद्याने व्यापण्याची शक्यता दिसत आहे. 

नगर जिल्ह्यात रब्बीचे ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीचे ४ लाख ७७ हजार ०१८ हेक्टर, तर १ लाख ५३ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. गव्हाचे सरासरी ५६ हजार ८२६ हेक्टर क्षेत्र असले तरी एक लाख हेक्टवरपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी होत आहे.

रब्बीमधील पेरणीत ज्वारीची १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबर, गहु व हरभऱ्याची १ आक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे पेरणी होते. मात्र कापूस क्षेत्र असलेल्या भागात मका, गव्हाची जानेवारीपर्यंत पेरणी होते. रब्बी व उन्हाळी कांद्याची जानेवारीअखेरपर्यंत लागवड होते. आतापर्यंत ज्वारीची २३ टक्के, गव्हाची २२ टक्के, मक्याची १६ टक्के, तर हरभऱ्याची १४.७६ टक्के पेरणी झाली आहे. रब्बीच्या पेरणीला अजून फारसा वेग आलेला नाही. 

जिल्ह्यात रब्बीत ज्वारीचे क्षेत्र ४ लाख ७७ हजार ०१८ हेक्टर तर १ लाख ५३ हजार ५२७ हेक्टर क्षेत्र हरभऱ्याचे आहे. ज्वारीची केवळ २३ टक्के म्हणजे १ लाख २८ हजार ५७४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कोपरगाव, राहुरी, संगमनेर, अकोले, राहाता, श्रीरामपूर, कर्जत तालुक्यात ज्वारीची पेरणी नाही. गव्हाची २२ टक्के, हरभऱ्याची सात टक्के पेरणी झाली. 

कांदा, गहु वाढण्याचा अंदाज 

जिल्ह्यात रब्बीतील ज्वारीसह इतर क्षेत्रात घट होणार आहे. त्या जागी कोणत्या पिकांची पेरणी होणार? या बाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विभागाने कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. मात्र जाणकारांच्या मतानुसार यंदा बहुतांश भागात पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे कांदा आणि गव्हाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.


इतर बातम्या
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...