agriculture news in marathi, rabbi season may in trobule due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसाच्या ओढीने रब्बीवर संकट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसावर २५ ते ३० टक्के रब्बी ज्वारीच्या पेरण्या उरकतात. यंदा पावसाअभावी अद्याप पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. पाणी नसल्याने डाळिंब, पेरू, द्राक्ष यांसह फळबागा राखणेही अवघड हाेणार आहे. पावसाळ्यात उपलब्ध होणारा ओला चारा नसल्याने जनावरांसाठी तीस किलोमीटर अंतरावरून चारा विकत आणावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी सर्व बाजूने कात्रीत सापडला आहे.  
- माणिक बरळ, कचरवाडी, निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे

पुणे  : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात धो-धो बरसणाऱ्या पावसाने पूर्व भागातील कोरडवाहू पट्ट्यात मोठी ओढ दिली आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांसह जिल्ह्याच्या दुष्काळी भागात रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, या भागात तर अवघे तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. एेन पेरणीच्या काळात पावसाने दडी मारली असल्याने रब्बीवरही संकट ओढवण्याची भीती आहे.

जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली. मात्र कोरडवाहू पट्ट्यात पावसाअभावी ढेकळेही फुटली नाहीत. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारली. मुळशी तालुक्यात ७ दिवस, भोर, वेल्हा, जुन्नर या तालुक्यांत पाच दिवस, मुळशी, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये चार दिवस, तर बारामती, दाैंड, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांत तीन दिवस तर हवेली तालुक्यात अवघा एक दिवस दखलपात्र पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले

पाऊस थांबल्याने भात, सोयबीन, भुईमुगासह खरीप पिकांना फटका बसणार आहे. दुसरीकडे कोरडवाहू भागात अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाई भासू लागली आहे. उन्हाची ताप वाढत असल्याने तेथील फळबागांवरही परिणाम होत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत जवळपास तीस टक्के रब्बीच्या पेरण्या उरकतात. यंदा मात्र पेरण्या खेळंबल्या अाहेत. माॅन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असून, या काळात पडणाऱ्या पावसाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.  

 

पुणे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पडलेला पाऊस, मिलिमीटमध्ये (स्रोत - कृषी विभाग)
तालुका   झालेला पाऊस टक्केवारी पाऊस दिवस
हवेली ९.९ ७.६
मुळशी  ७०.९ ४३ 
भोर  ४८.२ ३७.२
मावळ ८५.४  ५६.४  ७
वेल्हे  ६२.१ २४
जुन्नर  ३५.४ ३१.२
खेड २४.२  १७.७  ४
शिरूर २२.८ १७.४
बारामती ४०.६ २७
इंदापूर २३.६ १६.२
दौंड  १६.१  १२.३
पुरंदर २२.४ २०

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...