नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाशिवाय विविध पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. रब्बी पेरणीचे दिवस आले असले तरी अजूनही जिल्ह्याच्या बहुतांश भागांत पाऊस नसल्याने पेरणीला अडथळे येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये रब्बीत उसासह सरासरी ७ लाख ७ हजार नऊशे हेक्‍टर क्षेत्रावर यंदा पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन वर्षांतील पेरणी क्षेत्राच्या सरासरीनुसार यंदाचे गृहीत धरले आहे. त्यासाठी आवश्‍यक बियाणे, खतांचे कृषी विभागाकडून नियोजन केले जात आहे.

यंदा खरिपातही सुरवातीपासूनच पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, बाजरीला मोठा फटका बसला आहे. मूग, उडदाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनातही घट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कापूस पिकाची वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

रब्बी पेरण्यांना या दिवसांत सुरवात होत असते. मात्र यंदा अजूनही बहुतांश भागांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने संभाव्य पेरणी क्षेत्र निश्‍चित केले असले, तरी पावसाअभावी रब्बी पेरणीलाही उशीर होण्याची शक्‍यता आहे.

रब्बीतील अंदाजे पेरणी क्षेत्र (हेक्‍टर)
ज्वारी   ४,४०,०००
गहू  ९०,०००
मका २०,०००
हरभरा  १,००,०००
इतर कडधान्य  १६००
करडई ५००
तीळ  ५००
सूर्यफूल १००
ऊस   ५५,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com