परभणी विद्यापीठाचा ४१८ हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम

विद्यापीठाचा ४१८ हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम
विद्यापीठाचा ४१८ हेक्टरवर रब्बी बीजोत्पादन कार्यक्रम

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात ४१८.८ हेक्टरवर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आदी पिकांच्या पैदासकार, पायाभूत आणि प्रमाणित बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. रब्बी बीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून ३ हजार ३१५.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदा रब्बी बीजोत्पादनाचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे. सिंचनासाठी सुविधा असलेल्या ठिकाणी प्राधान्याने बीजोत्पादन घेतले जाणार आहे. या संदर्भात वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी माहिती दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील विविध पिकांची संशोधन केंद्रे, कृषी विद्यालये, कृषी महाविद्यालये आदी मिळून एकूण ४० ठिकाणच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या रब्बी हंगामात ४१८.८ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ज्वारी, गहू, करडई, हरभरा, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पैदासकार, पायाभूत आणि प्रमाणित बियाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्वारीच्या विविध वाणांचा एकूण ४६.५ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार आहे. त्यापासून ५५८ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.

गव्हाच्या विविध वाणांचे ५.८ हेक्टरवर बीजोत्पादन घेणार असून एकूण ११६ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. करडईच्या विविध वाणांचे २०२.५ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून १ हजार ४१७.५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. हरभऱ्याच्या विविध वाणांचे १५८ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून, त्यापासून १ हजार १८५ क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. जवसाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून त्यापासून १५ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. सूर्यफुलाचे ३ हेक्टरवर बीजोत्पादन घेण्यात येणार असून २४ क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे.

विविध पिकांच्या वाणांचे बीजोत्पादन क्षेत्र (हेक्टरमध्ये) कंसात बियाणे उत्पादन (क्विंटलमध्ये) ः

ज्वारी- परभणी मोती ः १६ (१९२० सीएसव्ही १८ ः ५.५ (६६), परभणी शक्ती ः २३ (२७६). पीएमएस २८ ए इन्टू बी  ः १ (१२). गहू - एनआयएडब्ल्यू ३०१ (त्र्यंबक)ः २ (४०), नेत्रावती ः १.८ (३६), समाधान ः २ (४०). करडई - पीबीएनएस १२ (परभणी कुसूम) ः १३२ (९२४) , पीबीएनएस ४० (बिनकाटेरी) ः २२ (१५४), पीबीएनएस ८६ (पूर्णा) ः ४८.५ (३३९.५). हरभरा- बीडीएनजी ७९७ (आकाश) ः ११२ हेक्टर (८४०), बीडीएनजीके ७९८ (काबुली) ः ४२ (३१५), फुले विक्रम ः ४ (३०). जवस - एलएसएल ९३ ः ३ (१५). सूर्यफूल - एमएस १७ ए ः १.५ (१२), एमएस १७ बी ः ०.५ (४), आरएचए १०१ ः १ (८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com