सातारा जिल्ह्यात रब्बीतील ज्वारीच्या क्षेत्रात १८ टक्के घट

Rabbi sorghum in Satara district decreases by 18 percent
Rabbi sorghum in Satara district decreases by 18 percent

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू पिकांची पेरणी काही प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर ८६.२० टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचा पेरणीचा कालावधी संपला असल्याने तिच्या क्षेत्रात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. 

 जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर आहे. त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ८५ हजार १७९ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ८६.२० टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी फलटण तालुक्‍यात ३४ हजार ६७० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख १३ हजार ७११ हेक्‍टर म्हणजेच ८१.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

रब्बी ज्वारी पेरणीचा कालावधी संपला असल्याने ज्वारीचे १८ टक्के क्षेत्र घटणार आहे. याचा काही प्रमाणात चाऱ्यावर परिणाम होणार आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून, २५ हजार ६५१ हेक्‍टर म्हणजेच ८८.८७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७२ हेक्‍टर असून, ३३ हजार ७६५ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ९७.९५ टक्के पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र दहा हजार ९४१ हेक्‍टर असून, ११ हजार ९४ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गहू पिकांची शंभर टक्क्यांकडे तर मक्याची शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. 

कांद्याच्या क्षेत्रात वाढ 

कांदे दर तेजीत राहिल्यामुळे जिल्ह्यात या हंगामात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागील सप्ताहापर्यंत दहा हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली असून हे १२ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे. यामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होणार आहे.   

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टर) 

सातारा ः १७,८४९ जावळी ः ६३५४, पाटण ः १५,०१५, कऱ्हाड ः ९२८२, कोरेगाव ः २१,४००, खटाव ः १८,०५३, माण ः ३३,१७०, फलटण ः ३४,६७०, खंडाळा ः १५,०७२, वाई ः १३,६६६, महाबळेश्वर ः ६४८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com