रोग, किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी यंत्रांचा वापर केला जातो.
ताज्या घडामोडी
खानदेशात रब्बी ज्वारी पेरणी पूर्णत्वाकडे
जळगाव : खानदेशात कोरडवाहू रब्बी ज्वारी किंवा दादरची पेरणी पूर्णत्वाकडे आली आहे. पुढील आठवड्यात ही पेरणी १०० टक्के पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
जळगाव : खानदेशात कोरडवाहू रब्बी ज्वारी किंवा दादरची पेरणी पूर्णत्वाकडे आली आहे. पुढील आठवड्यात ही पेरणी १०० टक्के पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
हरभऱ्यापाठोपाठ खानदेशात ज्वारीची पेरणी केली जाते. कोरडवाहू ज्वारी किंवा दादरासाठी खानदेशामधील जळगाव जिल्ह्यात जळगाव, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा हे तालुके प्रसिद्ध आहेत. कोरडवाहू ज्वारी तापी, गिरणा, गोमाई नदीकाठी अधिक असते. या ज्वारीला चांगली मागणी बाजारात असते. तसेच या ज्वारीचा कडबाही अधिक दरात गावातच विक्री होत असतो. कारण, हा कडबा पशुधनासाठी कसदार मानला जातो. ज्वारीची जळगाव जिल्ह्यात मिळून सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टर आणि धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे २५ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
शेतकरी वाफसा मिळताच काळ्या कसदार जमिनीत पेरणी पूर्ण करून घेत आहेत. मागील आठवड्यात पेरणीला चांगली गती आली होती. थंड वातावरण तयार होत असल्याने बीजांकुरणही सर्वत्र चांगले आहे. ज्या ज्वारीची पेरणी ऑक्टोबरच्या अखेरीस झाली होती, या ज्वारीचे पीकही जोमात आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या ज्वारीच्या पिकात तण वाढले. त्यात शेतकरी आंतरमशागत करून घेत आहेत.
पेरणी पूर्णत्वाकडे असली तरी यंदा चाराटंचाई असल्याने संकरित ज्वारी किंवा विद्यापीठांच्या संशोधित ज्वारी वाणांची डिसेंबरअखेरपर्यंतदेखील पेरणी होईल. चाराटंचाई पुढील महिन्यात जाणवणार आहे. यामुळे चाऱ्याला मोठी मागणी वर्षभर राहील. कसदार चारा व धान्याला उठाव यामुळे अनेक शेतकरी कापूस, केळी आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात ज्वारीची पेरणी करतील. यामुळे ज्वारीचे क्षेत्र वाढेल, अशी माहिती मिळाली.
- 1 of 1027
- ››