लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

Rabbi sowing on 14 lakh hectares in Latur region
Rabbi sowing on 14 lakh hectares in Latur region

लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत पाचही जिल्ह्यांत यंदा १४ लाख ५४ हजार ८६१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. परभणी वगळता लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. 

लातूर कृषी विभागांतर्गत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्‍टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १३१ टक्‍के अर्थात १४ लाख ५४ हजार ८६१ हेक्‍टरवर पेरणी झाली. लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९५ हजार १६३ हेक्‍टर होते. त्यांपैकी ३ लाख ४१ हजार ४०८ हेक्‍टरवर पेरणी झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ३१ हजार ४९६ हेक्‍टर, तर पेरणी ४ लाख २७ हजार ५३६ हेक्‍टरवर, नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ५५५ हेक्‍टर, तर पेरणी २ लाख ७५हजार ६४६ हेक्‍टरवर, परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १ हजार ४३१ हेक्‍टर, तर पेरणी २ लाख ५३ हजार ६३७ हेक्‍टरवर, हिंगोलीत सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८५ हेक्‍टर, तर पेरणी १ लाख ५६ हजार ६३४ हेक्‍टरवर झाली. टप्प्याटप्प्याने झालेल्या रब्बीच्या पेरणीत हरभऱ्याची दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

अशी आहे पिकांची स्थिती   

ज्वारी पक्‍वतेच्या, काढणीच्या अवस्थेत 
गहू ओंब्या येण्याच्या, पक्‍वतेची स्थिती 
हरभरा घाटे पक्‍वतेच्या, काढणीच्या स्थितीत
मका कणीस पक्‍वतेच्या अवस्थेत
करडई बोंड पक्‍व होण्याची स्थिती 
सूर्यफूल दाणे भरण्याच्या, बोंड पक्‍वतेच्या अवस्थेत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com