बीड जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

Rabbi sowing on 2 lakh hectares in Beed district
Rabbi sowing on 2 lakh hectares in Beed district

बीड : जिल्ह्यातील सर्वसाधारण ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर रब्बी क्षेत्रापैकी २ लाख १० हजार २१४ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वाधिक १ लाख ३० हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची, तर त्यापाठोपाठ हरभऱ्याची ६२ हजार ९३१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 

यंदा अवेळी पावसाने केवळ खरीप पिकांचाच घात केला नाही तर रब्बीची काही पेरलेली पीक पुन्हा पेरण्याची व जमीन तयार करण्यासाठी वापसा स्थितीच न झाल्याने जमीन रब्बी पिकांपासूनही वंचित ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा जरी रब्बीवरच अवलंबून असल्या तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बीची पेरणी होईल की नाही हा प्रश्न आहे. 

बीड जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८६ हजार हेक्‍टर आहे. त्या तुलनेत १ लाख ३० हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाच्या सर्वसाधारण ४७ हजार ९८० हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १४ हजार ७६३ हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली. मकाचे १२ हजार ९३२ हेक्‍टर क्षेत्राच्या तुलनेत १५२७ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७१ हजार २९० हेक्‍टर असताना प्रत्यक्षात ६२ हजार ९३१ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. जवळपास १९५ हेक्‍टरवर इतर कडधान्याची पेरणी झाली.

करडईचे क्षेत्र सातत्याने घटत चालले असून यंदा सर्वसाधारण २७८० हेक्‍टर करडईचे क्षेत्र असताना प्रत्यक्षात केवळ १४४ हेक्‍टरवर करडईची पेरणी झाली. ७३७ हेक्‍टर जवसाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४४ हेक्‍टरवर जवस, तर ६ हेक्‍टरवर इतर गळीतधाण्याची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

 धारूर, वडवणी व केज तालुक्‍यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाल्याचे तर आष्टी व अंबाजोगाई तालुक्‍यात जवळपास सर्वसाधारण क्षेत्राजवळ पेरणी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे परळी, बीड, पाटोदा, शिरूर, माजलगाव व गेवराई तालुक्‍यात अजूनही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणी ५० टक्‍के क्षेत्रावरही पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. 

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

बीड २०१८८
पाटोदा १८११९
आष्टी ६३११५
शिरूर  २४४४८
माजलगाव ९२४२
गेवराई १७१९७
धारूर ५०५६
वडवणी   २४५७
अंबाजोगाई २४१५१
केज  २१४००
परळी ४८४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com