Agriculture news in marathi Rabbi sowing on 76000 hectares in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता. २) पर्यंत ७६ हजार १९० हेक्टरवर (५०.९३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक ६५ हजार ८६८ हेक्टर (८९.०४ टक्के) एवढे आहे. अद्याप ज्वारीची पेरणी ३५ टक्क्यांपेक्षा कमी, तर गव्हाची पेरणी २० टक्क्यांच्या आतच आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता. २) पर्यंत ७६ हजार १९० हेक्टरवर (५०.९३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक ६५ हजार ८६८ हेक्टर (८९.०४ टक्के) एवढे आहे. अद्याप ज्वारीची पेरणी ३५ टक्क्यांपेक्षा कमी, तर गव्हाची पेरणी २० टक्क्यांच्या आतच आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८६ हेक्टर आहे. सर्वसाधारण क्षेत्रामध्ये ज्वारी १२ हजार ५१ हेक्टर, गहू ४४ हजार ४७० हेक्टर, रब्बी मका १ हजार १९ हेक्टर, हरभरा ७२ हजार ८५६ हेक्टर, तीळ २०० हेक्टर, जवस १०० हेक्टर, करडई १८ हजार १८६ हेक्टर, सूर्यफूल २९५ हेक्टर आहे. अद्यापपर्यंत ज्वारीची ३२.१९ टक्के क्षेत्रावर, गव्हाची १६.१९ टक्के, तर हरभऱ्याची ८९.०४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मक्याची २२.७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार ४९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ११ हजार ३१२ हेक्टरवर (१९.४९ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३१ हजार १०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ६४ हजार ८७८ हेक्टरवर (८८.८१ टक्के) पेरणी झाली आहे.

अन्नधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८५ हजार ९०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ७६ हजार १९० हेक्टरवर (५८.१२ टक्के) पेरणी झाली आहे.पेरणी क्षेत्रामध्ये हिंगोली तालुक्यात ३८.७४ टक्के क्षेत्र, कळमनुरी तालुक्यात ५२.९२  टक्के, वसमत तालुक्यात ३३.४६  टक्के, औंढानागनाथ तालुक्यात ६८.७५ टक्के, सेनगाव तालुक्यात ८५.६९ टक्के क्षेत्राचा समावेश आहे. यंदा येलदरी-सिद्धेश्वर, इसापूर येथील धरणांमध्ये, लघू सिंचन तलाव, विहिरी, बोअरमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा, गहू या पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस लागवड क्षेत्रदेखील वाढण्याची शक्यता आहे.

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी १२०५१ ३८७९   ३२.१९
गहू  ४४४७० ७२०१  १६.१९
हरभरा  ७२८५६  ६४८६८ ८९.०४
मका १०१९    २३२ २२.७७

 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...