मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
हिंगोली जिल्ह्यात रब्बीची ७६ हजार हेक्टरवर पेरणी
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता. २) पर्यंत ७६ हजार १९० हेक्टरवर (५०.९३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक ६५ हजार ८६८ हेक्टर (८९.०४ टक्के) एवढे आहे. अद्याप ज्वारीची पेरणी ३५ टक्क्यांपेक्षा कमी, तर गव्हाची पेरणी २० टक्क्यांच्या आतच आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता. २) पर्यंत ७६ हजार १९० हेक्टरवर (५०.९३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक ६५ हजार ८६८ हेक्टर (८९.०४ टक्के) एवढे आहे. अद्याप ज्वारीची पेरणी ३५ टक्क्यांपेक्षा कमी, तर गव्हाची पेरणी २० टक्क्यांच्या आतच आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८६ हेक्टर आहे. सर्वसाधारण क्षेत्रामध्ये ज्वारी १२ हजार ५१ हेक्टर, गहू ४४ हजार ४७० हेक्टर, रब्बी मका १ हजार १९ हेक्टर, हरभरा ७२ हजार ८५६ हेक्टर, तीळ २०० हेक्टर, जवस १०० हेक्टर, करडई १८ हजार १८६ हेक्टर, सूर्यफूल २९५ हेक्टर आहे. अद्यापपर्यंत ज्वारीची ३२.१९ टक्के क्षेत्रावर, गव्हाची १६.१९ टक्के, तर हरभऱ्याची ८९.०४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मक्याची २२.७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार ४९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ११ हजार ३१२ हेक्टरवर (१९.४९ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३१ हजार १०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ६४ हजार ८७८ हेक्टरवर (८८.८१ टक्के) पेरणी झाली आहे.
अन्नधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८५ हजार ९०० हेक्टर आहे. प्रत्यक्षात ७६ हजार १९० हेक्टरवर (५८.१२ टक्के) पेरणी झाली आहे.पेरणी क्षेत्रामध्ये हिंगोली तालुक्यात ३८.७४ टक्के क्षेत्र, कळमनुरी तालुक्यात ५२.९२ टक्के, वसमत तालुक्यात ३३.४६ टक्के, औंढानागनाथ तालुक्यात ६८.७५ टक्के, सेनगाव तालुक्यात ८५.६९ टक्के क्षेत्राचा समावेश आहे. यंदा येलदरी-सिद्धेश्वर, इसापूर येथील धरणांमध्ये, लघू सिंचन तलाव, विहिरी, बोअरमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हरभरा, गहू या पिकांच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस लागवड क्षेत्रदेखील वाढण्याची शक्यता आहे.
पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक | सर्वसाधारण क्षेत्र | पेरणी क्षेत्र | टक्केवारी |
ज्वारी | १२०५१ | ३८७९ | ३२.१९ |
गहू | ४४४७० | ७२०१ | १६.१९ |
हरभरा | ७२८५६ | ६४८६८ | ८९.०४ |
मका | १०१९ | २३२ | २२.७७ |
- 1 of 1022
- ››