agriculture news in marathi, rabbi sowing area may increase, pune, maharashtra | Agrowon

पुणे विभागात रब्बीचे क्षेत्र दीड लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

यंदा उशिरा पाऊस झाल्याने जमिनीत वेळेत वाफसा झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला असला तरी विभागात जवळपास दीड लाख हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यानुसार खते आणि बियाण्यांचा पुरवठा केला जात असून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही. काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.  
- दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग.

पुणे  ः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. विभागात पेरण्यांना उशिराने सुरुवात झाली असली तरी चालू वर्षी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दीड लाख हेक्टरने क्षेत्र वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी जवळपास १९ लाख २९ हजार ११३ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

पुणे विभागात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज असून त्यानुसार खते व बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हरभरा, गहू, ज्वारी या पिकांच्या क्षेत्रात प्रामुख्याने वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत पाच लाख ५६ हजार २८३ हेक्टर म्हणजेच सरासरी ३१ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

यंदा उशिराने दाखल झालेल्या पावसाने खरीप पेरण्याही उशिराने दाखल झाल्या होत्या. त्यातच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवातही उशिराने झाली. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसानेही काही प्रमाणात उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पुणे विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहे. काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हरभरा पेरणीस अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यातही खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची काढणी झाली आहे. बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही प्रमाणात फटका बसला असून पिकांच्या उगवणीचे प्रमाण कमी आहे. सोलापूरमध्येही रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची पेरणी सुरू झाली आहे. चालू महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यांत पेरणीस विलंब होत आहे. मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यांत पेरणी अंतिम टप्यात आहे. गहू व हरभरा पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...