मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग येईना
नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. तरी अजूनही जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग येत नसल्याचे चित्र आहे.
नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. तरी अजूनही जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग येत नसल्याचे चित्र आहे.
आतापर्यंत केवळ ३२ टक्के पेरणी झाली आहे. रब्बीत सर्वाधिक क्षेत्र असलेल्या ज्वारीची पेरणी ३८ टक्के झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यंदा पाणी उपलब्धतेमुळे कांदा, गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात रब्बीत ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. साधारण आक्टोबरमध्येच रब्बीच्या पेरण्या सुरु होतात. यंदा परतीचा पंधरा दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पेरण्याला वापसाच नव्हता. पेरण्यांना उशीर झाला.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, आतापर्यंत रब्बीत ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख २८ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. रब्बीत सर्वाधिक ४ लाख ७७ हजार ०१८ हेक्टरवर ज्वारीचे क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ८२ हजार ५८८ म्हणजे अवघ्या ३८ टक्के क्षेत्रावर ज्वारी पेरली आहे.
पाण्याच्या उपलब्धतेमुळे गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, आतापर्यंत ५६ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रापैकी ८ हजार ६४० हेक्टरवर म्हणजे १५ टक्के, हरभऱ्याच्या १ लाख ५३ हजार ६२७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ३१ हजार ६६२ हेक्टरवर म्हणजे २१ टक्के पेरणी झाली आहे.
यंदा कांदा, गहू व हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. मक्याची अवघी १४ टक्के, तर करडईची ९ टक्के, तिळाची २१ टक्के, जवसाची २४ टक्के, सूर्यफुलाची ६ टक्के पेरणी झाली आहे.
कापसाच्या जागी हरभरा, मका
पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नेवासा व अन्य काही भागांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा पावसाने तसेच बोंड आळीने कापसाचे मोठे नुकसान झाले. साधारण दोन वेचण्यातच कापूस मोकळा झाला. त्यामुळे अनेक भागात कापसाची काढणी करून त्याजागी कांदा, हरभरा, मका, गव्हाची पेरणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
- 1 of 1022
- ››