Agriculture news in marathi, Rabbi sowing in Khandesh 200 percent possible | Page 3 ||| Agrowon

खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे शक्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली आहे. यंदा २०० टक्के पेरणी होईल, असे चित्र आहे. मागील दोन वर्षे खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के झाली आहे. हरभऱ्याची पेरणी किमान सव्वा लाख हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे. 

जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली आहे. यंदा २०० टक्के पेरणी होईल, असे चित्र आहे. मागील दोन वर्षे खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के झाली आहे. हरभऱ्याची पेरणी किमान सव्वा लाख हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे. 

जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ९२ हजार हेक्टर आहे. पण, मागील दोन वर्षे जोरदार पावसाने पेरणी सव्वादोन लाख हेक्टरपर्यंत झाली आहे. धुळ्यातही १८० टक्क्यांवर रब्बीची पेरणी झाली आहे. तर, नंदुरबारातही रब्बीची पेरणी बऱ्यापैकी होते. यंदा नंदुरबारातील पेरणीदेखील किमान ११० टक्के होईल. नंदुरबारच्या उमर्दे व लगत किंवा दक्षिण भागात कमी पाऊस होता. नवापुरातही कमी पाऊस होता. यामुळे या भागात पेरणी कमी होईल. पण जळगाव जिल्ह्यातील पेरणी २०० टक्क्यांवर जाईल. 

खानदेशात सर्वाधिक सव्वा ते दीड लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी होईल. कोरडवाहू रब्बी ज्वारी, हरभऱ्याची पेरणी तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत अधिक होईल. याची तयारी सुरू आहे. हरभऱ्यापाठोपाठ ज्वारी, मका, गहू यांची पेरणी होईल. मका लागवडदेखील स्थिर राहील. काही भागात मका लागवड वाढू शकते. कारण, मक्याचे दर काही महिने स्थिर आहेत. बाजरीची पेरणीदेखील वाढेल. तसेच कांदा लागवडीचे नियोजनदेखील सुरू झाले आहे. जलसाठे मुबलक असल्याने गव्हाची पेरणीदेखील १०० टक्क्यांवर होईल, असे सांगितले जात आहे. 

हरभरा बियाणे वाटपाची विशेष कार्यवाही 

कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाने हरभरा बियाणे वितरणाबाबत विशेष कार्यवाही सुरू केली आहे. यंदा दिवाळीपूर्वीच पेरणी बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. कारण यंदा थंडीचे आगमन लवकर होईल, असे संकेत आहेत. कोरडे वातावरण राहिल्यास पेरणीला वेग येईल.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...