Agriculture news in marathi, Rabbi sowing on Kolhapur district only five percent area | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यावर होत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत रब्बीच्या केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे हा हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीत ओल असल्याने शेतकरी पेरणीला प्राधान्य देतील, पण रब्बी हंगाम उशिरा सुरू होईल, अशी शक्यता सध्या जिल्ह्यात आहे. 

कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यावर होत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत रब्बीच्या केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे हा हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीत ओल असल्याने शेतकरी पेरणीला प्राधान्य देतील, पण रब्बी हंगाम उशिरा सुरू होईल, अशी शक्यता सध्या जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्याखाली २९ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी केवळ १ हजार ५६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी ज्वारीची आहे. हरभरा, उडीद, मूग, आदी कडधान्याचे १० हजार २६७ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.

आतापर्यंत केवळ १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली. करडई, सूर्यफूल या गळित धान्याबाबतही स्थिती फारशी समाधानकारक नाही. 
त्यामुळे ४० हजार हेक्टर उद्दिष्टापैकी केवळ १ हजार ७६४ हेक्टरवर म्हणजेच एकूण क्षेत्राच्या केवळ ४.३८ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. 

पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. सुमारे चार महिन्यांत पिके मार्चअखेर पक्व अवस्थेत येतील. ओलावा कमी होऊन उत्पादन घटण्याची अधिक शक्यता असते. या परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी होईल. त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडेल, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...