कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
ताज्या घडामोडी
मराठवाड्यात रब्बी पिकांची २२ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामात २२ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांतील १० लाख २ हजार व लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १२ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यात पाऊस झाल्याने रब्बी पेरणीची लगबग सध्या वाढली आहे.

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख ५५ हजार हेक्टर आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १४ हजार, जालना जिल्ह्यातील २ लाख १८ हजार आणि बीड जिल्ह्यातील ४ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. गतवर्षी दुष्काळामुळे या तीनही जिल्ह्यांत केवळ २ लाख ८१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी झाली होती. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५३ हजार, जालना जिल्ह्यात ३ लाख, तर बीड जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ११ लाख १४ हजार हेक्टर आहे. त्यामध्ये लातूरमधील १ लाख ९५ हजार १६३, उस्मानाबादमधील ३ लाख ३१ हजार, नांदेडमधील १ लाख ३६ हजार, परभणीतील ३ लाख १ हजार तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यातुलनेत गतवर्षी रब्बी हंगामात प्रत्यक्षात ७ लाख ८४ हजार ४५९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती.
यंदा या पाचही जिल्ह्यांत प्रस्तावित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रात लातूरमधील ३ लाख ४३ हजार, उस्मानाबादमधील ३ लाख ६९ हजार, नांदेडमधील १ लाख ७७ हजार, परभणीमधील २ लाख ७७ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टरचा समावेश आहे.
रब्बी ज्वारी, करडईचे क्षेत्र घटण्याची शक्यता
औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत येत्या रब्बी हंगामात रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात २१ टक्के, तर करडईच्या क्षेत्रात १२ टक्के घट अपेक्षित आहे. इतर रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रातही ६८ टक्क्यांपर्यंत घट कृषी विभागाला अपेक्षित आहे. गव्हाच्या क्षेत्रात ३६, हरभऱ्याच्या क्षेत्रात ११९, मका क्षेत्रात ९८ टक्के वाढ अपेक्षित धरून एकूण रब्बी लागवड क्षेत्रात १५ टक्के वाढ कृषी विभागाने नियोजनात धरली आहे.
- 1 of 578
- ››