agriculture news in marathi, rabbi sowing planning, aurangabad, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात रब्बी पिकांची २२ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामात २२ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांतील १० लाख २ हजार व लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १२ लाख ९५ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश  असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यात पाऊस झाल्याने रब्बी पेरणीची लगबग सध्या वाढली आहे. 

औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रब्बी हंगामात २२ लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांतील १० लाख २ हजार व लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १२ लाख ९५ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश  असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यात पाऊस झाल्याने रब्बी पेरणीची लगबग सध्या वाढली आहे. 

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख ५५ हजार हेक्‍टर आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १४ हजार, जालना जिल्ह्यातील २ लाख १८ हजार आणि बीड जिल्ह्यातील ४ लाख २३ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. गतवर्षी दुष्काळामुळे या तीनही जिल्ह्यांत केवळ २ लाख ८१ हजार हेक्‍टरवर रब्बी पेरणी झाली होती. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५३ हजार, जालना जिल्ह्यात ३ लाख, तर बीड जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार हेक्‍टरवर रब्बी पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ११ लाख १४ हजार हेक्‍टर आहे. त्यामध्ये लातूरमधील १ लाख ९५ हजार १६३, उस्मानाबादमधील ३ लाख ३१ हजार, नांदेडमधील १ लाख ३६ हजार, परभणीतील ३ लाख १ हजार तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४९ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यातुलनेत गतवर्षी रब्बी हंगामात प्रत्यक्षात ७ लाख ८४ हजार ४५९ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती.

यंदा या पाचही जिल्ह्यांत प्रस्तावित करण्यात आलेल्या पेरणी क्षेत्रात लातूरमधील ३ लाख ४३ हजार, उस्मानाबादमधील ३ लाख ६९ हजार, नांदेडमधील १ लाख ७७ हजार, परभणीमधील २ लाख ७७ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्‍टरचा समावेश आहे.

रब्बी ज्वारी, करडईचे क्षेत्र घटण्याची शक्यता
औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत येत्या रब्बी‌ हंगामात रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात २१ टक्‍के, तर करडईच्या क्षेत्रात १२ टक्‍के घट अपेक्षित आहे. इतर रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रातही ६८ टक्‍क्‍यांपर्यंत घट कृषी विभागाला अपेक्षित आहे. गव्हाच्या क्षेत्रात ३६, हरभऱ्याच्या क्षेत्रात ११९, मका क्षेत्रात ९८ टक्के वाढ अपेक्षित धरून एकूण रब्बी‌ लागवड क्षेत्रात १५ टक्‍के वाढ कृषी विभागाने नियोजनात धरली आहे.  

इतर बातम्या
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...