साताऱ्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात

Rabbi sowing in Satara in the final stage
Rabbi sowing in Satara in the final stage

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली असून रब्बी ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपल्याने क्षेत्र घटणार आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर ७७.६८ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्यात पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या सुरूवातीपासून अडचणीचा ठरला आहे. पेरणीच्यावेळी अतिपावसामुळे कालावधी पुढे गेल्याने पेरण्याची कामे रखडली होती. जमीन वाफसा मिळेल तसतसे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सुरूवातीला रब्बी ज्वारीची पेरणी केली गेली. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ६६ हजार ८७० हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७७.६८ टक्के पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी माण तालुक्‍यात ३१ हजार २४६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख सहा हजार ७५९ हेक्‍टर म्हणजेच ७६.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारी पेरणीचा कालवधी संपला असल्याने ज्वारीचे २५ टक्के क्षेत्र घटणार आहे. याचा काही प्रमाणात चाऱ्यावर परिणाम होणार आहे.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून, २२ हजार ६५६ हेक्‍टर म्हणजेच ७८.५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७२ हेक्‍टर असून, २७ हजार १५५ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७८.८८ टक्के पेरणी झाली आहे. मक्‍याचे नऊ हजार ४१८ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टर) 

सातारा ः ११,८३१ जावळी ः ६३५४, पाटण ः १५,०१५, कऱ्हाड ः ९२८२, कोरेगाव ः २०,४७९, खटाव ः १३,८८६, माण ः ३१,२४६, फलटण ः ३०,४५६, खंडाळा ः १५,०७२, वाई ः १२,६२३, महाबळेश्वर ः ६४८.

कांदा तराव महागले...

या पिकांसह कांदा लागवडीस वेग आला आहे. कांद्याचे दर तेजीत असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. कांद्याची तरावाची मागणी वाढू लागल्याने तरावांची किंमत वाढली आहे. यामुळे भांडवली खर्चात वाढ होईल. पश्चिम भागात आडसाली तसेच लागणीचे ऊस तुटल्यावर यामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली जात असल्याने कांद्याची रोपे तयार केली जात आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com