नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यांचा वेग मंदावला

नाशिक : चालु वर्षी मॉन्सून नंतरच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्याचे एकंदरीत चित्र आहे.
 Rabbi sowing slowed down in Nashik district
Rabbi sowing slowed down in Nashik district

नाशिक : चालु वर्षी मॉन्सून नंतरच्या  पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर गेल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ लाख १२ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रापैकी ७६ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण पेरणी क्षेत्रापैकी ही टक्केवारी ६७.६३ इतकी आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात पीकनिहाय गहू, हरभरा क्षेत्र सर्वाधिक असते. मात्र, यंदा गहू पेरण्या अजूनही सुरू आहेत. त्यामुळे त्या डिसेंबरअखेर चालतील, असे बोलले जात आहे. त्या तुलनेत हरभरा क्षेत्र वाढेल, असे चित्र होते. मात्र, हरभरा पेरण्या कमी झाल्याची स्थिती आहे. सिन्नर, कळवण, मालेगाव, येवला तालुक्यात पेरण्या अधिक असतात. मात्र, यावर्षी चित्र बदलले आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर पेरा गव्हाचा आहे. त्यामध्ये सर्वाधिक पेरणी दिंडोरी, सिन्नर, येवला व मालेगाव तालुक्यात आहे. तर, गहू प्रस्तावित क्षेत्र अधिक असूनही गव्हाचे क्षेत्र निफाड तालुक्यात घटत आहे. यंदा रब्बीतील मका पेरण्या प्रस्तावित क्षेत्रावर पूर्ण झाल्याची स्थिती आहे. सर्वाधिक क्षेत्र सिन्नर, येवला, सटाणा व नांदगाव तालुक्यात आहे. हरभरा पेरण्या सटाणा, नांदगाव, दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक आहेत. तर, इतर तालुक्यांत या पेरण्या पूर्ण झाल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. 

गळीत धान्याचे क्षेत्र शून्यावर

खरीप हंगामात गळीत धान्याचे क्षेत्र नगण्य होते. तर, रब्बी हंगामात जवस, सूर्यफूल, करडईच्या पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे पेरा शून्यावर आला आहे.  उन्हाळ कांदा लावला आहे. गहू कमी केला. असेच चित्र सर्व भागात आहे. त्यामुळे गहू पिकाचा पेरा घटला आहे.  - विजय भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव बसवंत, ता. येवला. 

 उन्हाळ कांदा लावला आहे. गहू कमी केला. असेच चित्र सर्व भागात आहे. त्यामुळे गहू पिकाचा पेरा घटला आहे.  - विजय भोरकडे, शेतकरी, पिंपळगाव बसवंत, ता. येवला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com