पुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त कार्यपद्धतींच्या अवलंबाअभावी राज्यात गाय-म्हशींची
बातम्या
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरा
नगर ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी अजून अनेक भागांत रब्बी ज्वारीच्या पेरण्यांना फारसा वेग येताना दिसत नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या अवघ्या ४१ टक्के क्षेत्रावर म्हणजे १ लाख ९१ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. रब्बीची एकूण पेरणी आतापर्यंत अवघ्या ३१ टक्के क्षेत्रावर झाली आहे. अजूनही अनेक भागांत वाफसा नसल्याने रब्बी पेरणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी ६ लाख ६७ हजार २६१ क्षेत्र आहे. रब्बीत ज्वारी हे प्रमुख पीक असून ज्वारीचे सरासरी ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी बहूतांश भागात पावसाअभावी ज्वारीची पेरणीच झाली नव्हती. जेथे पेरणी झाली त्या भागातही पाणी मिळाले नसल्याने पीक आले नव्हते. यंदा अगदी रब्बी पेरणी सुरू होईपर्यंत अनेक भागांत पुरेसा पाऊस नव्हता. मात्र ऑक्टोबर महिन्यात सलग वीस ते पंचवीस दिवस पाऊस झाल्याने मात्र आता रब्बीच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, यंदा रब्बी पेरणीला उशीर होत आहे. पावसामुळे अजूनही अनेक भागांत वाफसा नसल्याचाही परिणाम रब्बी पेरणीवर झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत गव्हाची १ टक्का, हरभऱ्याची १० तर तृणधान्यांची सरासरी ३६ टक्के पेरणी झाली आहे. जामखेडमध्ये पेरणीचा वेग चांगला आहे. तेलबियांची तर पेरणीच नाही. ऊसलागवडही अवघी सतरा टक्के झाली आहे.
पेरणीला होतोय उशीर
रब्बी पेरणीला दरवर्षी साधारण ऑक्टोबरमध्येच सुरवात होत असते. गव्हाची पेरणीही त्याच महिन्यात सुरू होते. यंदा मात्र अजूनही पेरणीला वेग येताना दिसत नाही. गव्हासाठी पोषक असलेली थंडीही पडेनाशी झाली आहे. शिवाय अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्याने वाफसा नाही. परिणामी, रब्बी पेरणीला उशीर होताना दिसत आहे.
रब्बी पेरणीचे सरासरी क्षेत्र (हेक्टर) (कंसात पेरणी झालेले क्षेत्र) : ज्वारी ः ४,६९,७८५ (१,९१,७१२), गहू ः ४९,७८५ (५०६), हरभऱा ः १,१८,१०३ (१०,४०८), करडई ः ८४४ (४२), तीळ ः १५९ (०), जवस ः १६४ (५), सूर्यफुल ः ८७ (१), इतर तृणधान्य ः २७४ (२८), इतर कडधान्य ः ७९९ (२४१), इतर गळीतधान्य ः १६ (०).
- 1 of 913
- ››