परभणीत ज्वारीची ४६ हजार हेक्टरवर पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात यंदा रब्बी पेरणीस विलंब झाला आहे. बुधवारपर्यंत (ता. २०) ६४ हजार ८३३ हेक्टरवर (२३.३७ टक्के) रब्बीची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक ४६ हजार ४९७ हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हरभरा, गहू या पिकांकडे असल्याचे दिसत आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारीची १ लाख ५९ हजार ७८, गव्हाची ३० हजार ४७६, हरभऱ्याची ५३ हजार २६४, जवसाची १ हजार १९९, सूर्यफुलाची १ हजार ९३ हेक्टर पेरणी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पेरणी लांबणीवर पडली होती. त्यात सोयाबीनची सुगी, कापूस वेचणी ही कामे देखील सुरू आहेत. पावसामुळे शेतांमध्ये तणकट वाढले आहे. मशागतींसह अन्य कामांसाठी मजुरांचा तुटवडा आहे. त्यामुळे रब्बी पेरणीस उशीर होत आहे. यंदा ज्वारीच्या पेरणीस उशीर झाला आहे. त्यामुळे घरचे अन्नधान्य आणि पशुधनासाठी कडबा एवढ्या गरजा भागविण्यापुरती ज्वारीची पेरणी केली जात आहे.

ज्वारीची अद्याप ३० टक्के क्षेत्रावर देखील पेरणी झालेली नाही. सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे हरभरा, गव्हाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. करडईच्या क्षेत्रात यंदाही घट राहण्याची शक्यता दिसत आहे. बुधवारपर्यंत (ता. २०) सेलू तालुक्यात सर्वाधिक ३० हजार १७८ हेक्टर क्षेत्रावर तर पालम तालुक्यात सर्वात कमी ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.   

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक  सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्के
ज्वारी  १,५९,०७८  ४६,४९७ २९.२३
गहू ३०,४७६ २१४० ७.०२
हरभरा ५३,०६४ १५,०४१ २८.३५
करडई  २५,२०९  ११४२  ४.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com