agriculture news in marathi, rabbi sowing status in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

माझ्याकडे २१ एकर शेती आहे. त्यापैकी ज्वारीची दहा एकरांवर पेरणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड केली आहे. पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
- भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, करडे, जि. पुणे.

पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना उशिरा सुरुवात झाली आहे. पुणे विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर असून त्यापैकी आतापर्यंत तीन लाख ९७ हजार २७९ हेक्टरवर म्हणजेच सरासरी २२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला आहे. पाण्याची उपलब्धता बघता पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

यंदा उशीर पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरण्यांना उशीर झाला होता. त्यातच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांनाही उशिराने सुरुवात झाली. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. पावसाने उघडीप दिल्याने गहू, हरभरा पेरणीला वेगाने सुरुवात होईल.    

विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्यात आली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेल्या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हरभरा पेरणीस अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची काढणी झाली आहे. बाजरीची काढणी अंतिम टप्यात आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, मका या पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. पावसामुळे पिकांना काही प्रमाणात फटका बसला असून पेरणी झालेल्या पिकांच्या उगवणीचे प्रमाण कमी आहे.

सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू झाली आहे. चालू महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यांत पेरणीस विलंब होत आहे. त्याचबरोबर मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस व पंढरपूर तालुक्यांत पेरणी अंतिम टप्यात आहे. गहू व हरभरा पिकांची नुकतीच पेरणी सुरू झाली असून, पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र,  पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र   पेरणीचे क्षेत्र टक्के
नगर   ६,६७,२६१ १,९५,५३५ २९
पुणे ३,९१,८९७  ४७,४४८ १२
नगर  ७,२१,८७७ १,५४,२९६  २१
एकूण   १७,८१,०३५ ३,९७,२७९ २२

 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...