agriculture news in marathi, rabbi sowing status, satara, maharashtra | Page 2 ||| Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बीची ३१ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील विविध पिकांची आतापर्यंत ३१.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारीची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात काही ठिकाणी झालेला पाऊस रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील विविध पिकांची आतापर्यंत ३१.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये रब्बी ज्वारीची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात काही ठिकाणी झालेला पाऊस रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असला, तरी सध्या या तालुक्यांना दुष्काळ्याच्या झळा बसत आहेत. त्यातूनही पाऊस पडेल या आशेवर रब्बी पेरणीची कामे संथगतीने सुरू आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी ६७ हजार ८४४ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरेगाव तालुक्‍यात १६ हजार २९७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झालेली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर असून, त्यापैकी ५८ हजार ५११ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ४२.०६ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून त्यापैकी ५ हजार ३६५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, तीन हजार ३२७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७३ हेक्‍टर असून, ३४६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून चाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ज्वारी व मका पिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात पेरणीच्या कामांना गती आली आहे. थंडीत वाढ होईल तसा हरभरा व गहू पिकांच्या पेरणीस वेग येणार आहे.
 
पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टर) : सातारा ६३८३, जावळी २४१८, पाटण ५०२१, कऱ्हाड १३९१, कोरेगाव १६,२९७, खटाव ९७५२, माण ५८१६, फलटण ८९२२, खंडाळा ४४७८, वाई ७३११, महाबळेश्वर ५५.


इतर ताज्या घडामोडी
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...