agriculture news in marathi, rabbi sowing status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात रब्बीची ६८ टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी पेरणीस वेग आला आहे. मंगळवारअखेर (ता. ४) ६८.४१ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   

सातारा  ः जिल्ह्यात रब्बी पेरणीस वेग आला आहे. मंगळवारअखेर (ता. ४) ६८.४१ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२२ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ४६ हजार ९५४ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ६८.४१ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्‍यात सर्वाधिक २७ हजार ९८३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख पाच हजार ६०५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. थंडीत वाढ होऊ लागल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी १७ हजार ५३५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गहू पिकाचे ३४ हजार ४७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, गव्हाची १५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, सहा हजार १३७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

पश्चिमेकडील तालुक्यांमध्येही पेरणीची कामे सुरू आहे. उसात आंतरपिक म्हणून हरभरा, मक्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात पेरणीची कामे मोठ्या प्रमाणात उरकली आहे. मात्र, या तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर) ः सातारा - १२,३३१, जावली - ४५०५, पाटण - ११,७५९, कऱ्हाड - ९,३१२, कोरेगाव - २२,७५०, खटाव -१६,९८५, माण-२७,९८३, फलटण - २१,६५७, खंडाळा - ८६०५, वाई - १०,६१२, महाबळेश्वर - ४५५.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...