सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के क्षेत्रावर पेरणी

सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के क्षेत्रावर पेरणी
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के क्षेत्रावर पेरणी

सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सर्वत्र शेतकरी पेरणी कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. जिल्ह्यात गुरुवारअखेर (ता. १४) १३.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी दुष्काळग्रस्त माण तालुक्यात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात पाऊस लांबल्याने रब्बी हंगामाचा कालावधी वाया गेला आहे. प्रामुख्याने रब्बी ज्वारी कालावधी पुढे गेला असल्याने रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच पावसामुळे खरीप पिके काढण्यास विलंब झाला असल्याने रब्बीसाठी शेत तयार करणे व मशागत झालेल्या शेतात पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरी कामात व्यस्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) २९ हजार १६६ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच १३.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असतो. मात्र, या तालुक्यांत वादळी पाऊस जास्त झाला असल्याने हंगाम सुरू होऊनही पेरणीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. 

जिल्ह्यात माण तालुक्‍यात सर्वाधिक २१ हजार ९०५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र यंदा घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ११२ हेक्‍टर असून, त्यापैकी २५ हजार ३६१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी एक हजार १९२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, दोन हजार १५४ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सध्या पेरणीस पोषक वातावरण व शेतात चांगला घात असल्याने पेरणी कामांना वेग आला असल्याने पुढील सप्ताहापर्यंत पेरणीचे क्षेत्र दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com