वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी

अवकाळी पावसामुळे सोयाबीन गेले. तुरीचा हंगामही लांबला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातूनही सावरत शेतकरी आता रब्बीकडे वळाला आहे. नुकतीच गव्हाची पेरणी केली आहे. - बालाजी कोरडे, शेतकरी, फाळेगाव,ता. जि. वाशीम शेतकऱ्यांनी रब्बीसाठी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने बियाणे निवड करावी. या वर्षी जमिनीत आर्द्रता अधिक असल्याने बीजप्रक्रिया ही महत्त्वाची राहणार आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा; सोबतच ‘पंदेकृवि’चे वाण असलेल्या रब्बी ज्वारीला पसंती द्यावी. चाऱ्याची समस्या यातून सोडविता येईल. सोबतच मोहरी, जवस, करडई याचाही लागवडीसाठी विचार करावा. शेतकऱ्यांनी बियाणे साठविण्यासाठी आत्तापासून तयारीला लागावे. त्यामुळे वारंवार नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. - डॉ. रवींद्र काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके, करडा, जि. वाशीम
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी

वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख हेक्टरचे नियोजन असून, अपेक्षेप्रमाणे यंदाही हरभऱ्याची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज आहे. यंदाची परिस्थिती रब्बीसाठी पोषक असल्याने कृषी विभागाने एक लाख हेक्टरचे नियोजन केले आहे.

पावसामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक लागवड क्षेत्र होते. जवळपास ८० टक्क्यांवर क्षेत्र बाधित झाले. या अडचणीतून मार्ग काढत शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. जिल्हयात रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, वाशीम, मंगरुळपीर या सर्वच तालुक्यांमध्ये रब्बीचा हंगाम कमी-अधिक प्रमाणात साधला जातो. अतिपावसामुळे सध्याही जमिनीत ओल टिकून आले. जेथे वाफसा झाला, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागत करून लागवड सुरू केली.

हरभरा, गहू पेरणीच्या कामाला जिल्ह्यात सुरवात झाली आहे. या तीन पिकांची प्रामुख्याने रब्बीत लागवड केली जाते. मागील हंगामात ७९५१२ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाची परिस्थिती पाहता ही लागवड यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.  

यंदाचे नियोजित क्षेत्र (हेक्टर)

हरभरा ७२०००
गहू २५०००
रब्बी ज्वारी १०००
मका १०००

तालुकानिहाय रब्बी क्षेत्र (हेक्टर)

वाशीम  २०५५०
मालेगाव १४६००
रिसोड ३०६००
मंगरुळपीर ११५००
मानोरा ११४००
कारंजा ११३५०
एकूण १०००००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com