Agriculture news in marathi, Rabbi will be sown on one lakh hectares in Washim district | Agrowon

वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अवकाळी पावसामुळे सोयाबीन गेले. तुरीचा हंगामही लांबला आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातूनही सावरत शेतकरी आता रब्बीकडे वळाला आहे. नुकतीच गव्हाची पेरणी केली आहे.  
- बालाजी कोरडे, शेतकरी, फाळेगाव, ता. जि. वाशीम 

शेतकऱ्यांनी रब्बीसाठी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने बियाणे निवड करावी. या वर्षी जमिनीत आर्द्रता अधिक असल्याने बीजप्रक्रिया ही महत्त्वाची राहणार आहे. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा; सोबतच ‘पंदेकृवि’चे वाण असलेल्या रब्बी ज्वारीला पसंती द्यावी. चाऱ्याची समस्या यातून सोडविता येईल. सोबतच मोहरी, जवस, करडई याचाही लागवडीसाठी विचार करावा. शेतकऱ्यांनी बियाणे साठविण्यासाठी आत्तापासून तयारीला लागावे. त्यामुळे वारंवार नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. 
- डॉ. रवींद्र काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके, करडा, जि. वाशीम

वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख हेक्टरचे नियोजन असून, अपेक्षेप्रमाणे यंदाही हरभऱ्याची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज आहे. यंदाची परिस्थिती रब्बीसाठी पोषक असल्याने कृषी विभागाने एक लाख हेक्टरचे नियोजन केले आहे.

पावसामुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक लागवड क्षेत्र होते. जवळपास ८० टक्क्यांवर क्षेत्र बाधित झाले. या अडचणीतून मार्ग काढत शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला आहे. जिल्हयात रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, वाशीम, मंगरुळपीर या सर्वच तालुक्यांमध्ये रब्बीचा हंगाम कमी-अधिक प्रमाणात साधला जातो. अतिपावसामुळे सध्याही जमिनीत ओल टिकून आले. जेथे वाफसा झाला, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागत करून लागवड सुरू केली.

हरभरा, गहू पेरणीच्या कामाला जिल्ह्यात सुरवात झाली आहे. या तीन पिकांची प्रामुख्याने रब्बीत लागवड केली जाते. मागील हंगामात ७९५१२ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाची परिस्थिती पाहता ही लागवड यावर्षी एक लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे.  

यंदाचे नियोजित क्षेत्र (हेक्टर)

हरभरा ७२०००
गहू २५०००
रब्बी ज्वारी १०००
मका १०००

तालुकानिहाय रब्बी क्षेत्र (हेक्टर)

वाशीम  २०५५०
मालेगाव १४६००
रिसोड ३०६००
मंगरुळपीर ११५००
मानोरा ११४००
कारंजा ११३५०
एकूण १०००००

 


इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
सोलापुरात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी...सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा...