रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार : तहसिलदार वारुळे

येवला: शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी मक्याचा उल्लेख आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी, पंचनामा करून पीक असेल त्या शेतकऱ्यांची रब्बी मका नोंद करण्यास तलाठ्यांना सुचित केले आहे, अशी माहिती तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी दिली.
Rabbi will see maize and record on transcript: Tehsildar Warule
Rabbi will see maize and record on transcript: Tehsildar Warule

येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी मक्याचा उल्लेख आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी, पंचनामा करून पीक असेल त्या शेतकऱ्यांची रब्बी मका नोंद करण्यास तलाठ्यांना सुचित केले आहे, अशी माहिती तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी दिली. 

किमान आधारभूत किंमत भरडधान्य खरेदी योजनेंर्तगत शासकीय रब्बी मका खरेदीचा प्रारंभ शासकीय गोदाम अंगणगाव येथे झाला. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दत्ता आहेर यांनी खरेदीचा प्रारंभ केला. तहसिलदार वारुळे, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, पालकमंत्री भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे आदी उपस्थित होते. माजी अध्यक्ष भागुनाथ उशीर, दिनेश आव्हाड यांनी गावोगावी रब्बी मका असूनही तलाठी रब्बी मका नोंद देण्यास टाळाटाळ करत आहेत, असे वारुळे यांच्या निर्दशनास आणून दिले. 

खरीप-रब्बी असा भेद न करता शासनाने सरसकट मका खरेदी करावी, अशी मागणी जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, पालकमंत्री भुजबळ, खासदार भारती पवार यांनी केली आहे. परंतु, शासन स्तरावरून कुठलेच अधिकृत आदेश न आल्याने अखेर तालूका खरेदी विक्री संघाद्वारे रब्बी हंगाम मका शासकीय खरेदीस प्रारंभ झाला. 

ऑनलाइन नोंदणी केलेल्या मक्याची खरेदी आजपासून सुरू झाली. हेक्टरी ३१ क्विंटल मर्यादेप्रमाणे एफएक्यू दर्जाची रब्बी मका खरेदी होणार आहे. आजपर्यंत ४०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. नोंदणी प्रक्रिया खरेदी विक्री संघ कार्यालयात सुरू आहे. 

केंद्रावर मका विक्रीसाठी प्रथम आलेल्या शेतकरी आण्णा बोराडे यांचा अध्यक्ष दत्ता आहेर यांच्या हस्ते सत्कार झाला. या प्रसंगी माजी अध्यक्ष भागुनाथ उशीर, दिनेश आव्हाड, दामु पवार, उपाध्यक्ष संतोष लभडे, संचालक दत्तात्रय वैद्य,  रामदास पवार, पुरवठा निरिक्षक प्राजक्ता कुलकर्णी, लेखापाल बाळासाहेब हावळे, सहकार आधिकारी विजय बोरसे,  बाजार सचिव कैलास व्यापारे, संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव, गोदामपाल भाउसाहेब कुंभार्डे आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com