Agriculture News in Marathi Rabbi will stay this year as well The sway of the gram | Agrowon

रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच बोलबाला 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या हंगामाच्या दृष्टीने कृषी खात्याने नियोजनही केले. वऱ्हाडात याही हंगामात पुन्हा एकदा हरभऱ्यावरच शेतकऱ्यांचा जोर राहील, असा अंदाज आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. 

अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या हंगामाच्या दृष्टीने कृषी खात्याने नियोजनही केले. वऱ्हाडात याही हंगामात पुन्हा एकदा हरभऱ्यावरच शेतकऱ्यांचा जोर राहील, असा अंदाज आहे. अकोला, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत सुमारे पावणेचार लाख हेक्टरपर्यंत हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली जात आहे. 

पाऊस ओसरताच खरिपातील सोयाबीनची काढणी वेगाने होत आहे. सोयाबीनच्या खाली होणाऱ्या शेतात बहुतांश शेतकरी हरभऱ्याची लागवड करीत असतात. रब्बीत हरभऱ्याचे खात्रीशीर पिकही येत असल्याने दर वर्षी हा पेरा वाढतोच आहे. यंदा वऱ्हाडात पाऊसही अधिक झालेला आहे. शिवाय सर्वच प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणी आहे. विहिरींची पातळीही वाढलेली असल्याने सिंचनासाठी पाण्याची अडचण राहलेली नाही. त्यामुळे रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. 

प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याची १ लाख ९९ हजार हेक्टरपर्यंत लागवड अपेक्षित आहे. गेल्या हंगामात याच जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाली होती. तुलनेने हे क्षेत्र यंदा आणखी काही हजार हेक्टरने वाढून कदाचित दोन लाख हेक्टरचा आकडा पार करू शकेल, अशी परिस्थिती आहे. 

अकोल्यात गेल्या हंगामाच्या तुलनेने सहा हजार हेक्टरची वाढ होऊ शकते. गेल्या वेळी ९४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. या वर्षी १ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी होऊ शकेल. वाशीम जिल्ह्यात मागील रब्बीत ६० हजार हेक्टरवर पेरणी होती. ती यंदा ६५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. 

गव्हाच्या लागवडीत घट 
रब्बीत गव्हाची पेरणी तीनही जिल्ह्यांमध्ये घट होईल, अशी दर्शविण्यात आली आहे. बुलडाण्यात गेल्या वर्षी ७९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गव्हाचे क्षेत्र तेथे ७५ हजार राहू शकते. अकोल्यात २१७९०च्या तुलनेत २० हजार हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ३७८१०च्या तुलनेत ३५ हजार हेक्टरवर पेरणी होईल, अशी शक्यता आहे. 

करडईची लागवड वाढणार 
शासनाने या हंगामात महाज्योती अभियानांतर्गत तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे हंगामात तीनही जिल्ह्यांत करडईची लागवड पाच हजार हेक्टरवर करण्याचे नियोजन आहे. यात अकोल्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, तर बुलडाणा १८०० आणि वाशीम जिल्ह्यात १२०० हेक्टरवर पेरणी होऊ शकेल. 

मका पिकाचे वाढीव नियोजन 
विदर्भात सर्वाधिक मका बुलडाणा जिल्ह्यात घेतल्या जातो. यंदाच्या रब्बीत या जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या हंगामात ११ हजार ८२० हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. अकोल्यातही ५२० हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात १०९१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. 

जिल्हानिहाय रब्बी नियोजन 
जिल्हा गेल्या हंगामातील लागवड यंदाची प्रस्तावित लागवड 
बुलडाणा ३०४१४४ ३०२४७ 
अकोला ११६९७८ १२६३८० 
वाशीम ९९८४५ १०३६०० हेक्टर  
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...