Rabbi's crop loan 3.08 percent distribute in Hingoli district
Rabbi's crop loan 3.08 percent distribute in Hingoli district

हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे ३.०८ टक्के पीककर्ज वाटप

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात शुक्रवार (ता.२२) पर्यंत ७२७ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख ४१ हजार रुपये (३.०८ टक्के) एवढे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. सर्वच बॅंकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळाले नाही.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २७४ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये एवढे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ३७ कोटी रुपये, व्यापारी बॅंकांना १९७ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ४० कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे.

खरिप हंगामातील पीक कर्जवाटप ३० सप्टेंबरपर्यंत तर रब्बी पीककर्ज वाटप एक ऑक्टोबरपासून सुरू होते. यंदा खरिप पीककर्ज वाटपाची गती संथ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. रब्बी हंगामातही बँकांनी पीककर्ज वाटपात गती घेतलेली दिसत नाहीये. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत केवळ ७२७ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख ४१ हजार रुपये (३.०८ टक्के) एवढेच कर्जवाटप झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट असूनही त्यांनी खरिप पीककर्जाप्रमाणेच रब्बी पीक कर्ज वाटपातही हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बॅंकांनी ४२५ शेतकऱ्यांना ६ कोटी ५७ लाख १३ हजार रुपये (३.३३ टक्के) एवढे पीककर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १९८ शेतकऱ्यांना १ कोटी ६१ लाख ५३ हजार रुपये (४.०६ टक्के) एवढे पीककर्ज वाटप केले आहे.

बॅंकनिहाय रब्बी पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम  शेतकरी  टक्केवारी
जिल्हा बॅंक ३७.००  ०.२४७५  १०४ ०.६७
व्यापारी बॅंका  १९७.४८३८ ६.५७१३   ४२५ ३.३३
म.ग्रा.बॅंक ४०.००   १.६२५३ १९८ ४.०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com