परभणीत रब्बीचे पीक कर्जवाटप बॅंकांनी रखडवले

परभणी ः परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदा रब्बी हंगामात २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत ४० हजार ५६३ शेतकऱ्यांना २९१ कोटी २६ लाख रुपये (४७.९९ टक्के) पीक कर्जवाटप केले आहे.
Rabbi's crop in Parbhani Banks delayed lending
Rabbi's crop in Parbhani Banks delayed lending

परभणी ः परभणी जिल्ह्यातील बँकांनी यंदा रब्बी हंगामात २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत ४० हजार ५६३ शेतकऱ्यांना २९१ कोटी २६ लाख रुपये (४७.९९ टक्के) पीक कर्जवाटप केले आहे. त्यात २५ हजार ९२५ शेतकऱ्यांना १५५ कोटी १६ लाख रुपये नवीन पीककर्ज आहे. एकूण १४ हजार ६३८ शेतकऱ्यांना १३६ कोटी १० लाख रुपये कर्जाचे नूतनीकरण केले आहे. केवळ भारतीय स्टेट बँकेने उद्दिष्टपूर्ती केली आहे. परंतु अन्य बँकांचे कर्जवाटप रखडले आहे . त्यामुळे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची दाट शक्यता आहे. 

जिल्ह्यातील बँकांना यंदाच्या रब्बी हंगामात ६०६ कोटी ९८ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना २६१ कोटी ९९ लाख रुपये, खासगी बँकांना ३४ कोटी २० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ६३ कोटी १४ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला २४७ कोटी ६५ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

फेब्रुवारीअखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी २१ हजार ५८० शेतकऱ्यांना २०१  कोटी ४६ लाख रुपये (७६.९० टक्के), खासगी बँकांनी ७५८ शेतकऱ्यांना ८ कोटी ५८ लाख रुपये (२६.२६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ हजार ९३६ शेतकऱ्यांना २६ कोटी ८८ लाख रुपये (४२.५७ टक्के) कर्जवाटप केले.जिल्हा बँकेने १५ हजार २८९ शेतकऱ्यांना ५३ कोटी ९४ लाख रुपये (२१.७८ टक्के) कर्ज वाटप केले आहे. गतवर्षी (२०२१) फेब्रुवारी अखेरपर्यंत २९ हजार ९९९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ८४ लाख रुपये कर्जवाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com