सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर नियोजन 

सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८० हजार ६०० हेक्‍टर आहे.
रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर नियोजन  Rabbi's planning on three lakh hectares
रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर नियोजन  Rabbi's planning on three lakh hectares

सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ८० हजार ६०० हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे ३६ हजार २५९ क्विंटल बियाणे, १ लाख २४ हजार २३० टन खतांची मागणी केलेली आहे. ऑक्‍टोबरमध्ये थंडीची चाहूल लागल्यानंतर प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होते. जिल्ह्यात १५१ गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या २५१ पर्यंत वाढली आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात ११ पथकांची नियुक्ती केली आहे.  सांगली जिल्ह्यात पूर्व भागात दुष्काळी, मध्य भागात बागायती, जिरायत आणि पश्‍चिम भागात डोंगराळ भागाचा समावेश आहे. त्यात परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र आटपाडी, जत या दोन तालुक्‍यांत असून, शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे.  खरीप हंगामात युरियाच्या टंचाईला तोंड द्यावे लागले होते. रब्बीसाठी १ लाख २४ हजार २३० टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. त्यामध्ये युरिया- ३८ हजार २३० टन, डीएपी- १८ हजार ५८० टन, एमओपी- १० हजार ६८०, एनपीके ३५ हजार १८०, एसएसपी २८ हजार ८९० टन मागवली आहेत. 

जिल्ह्यातील रब्बी पिकांवर दृष्टीक्षेप  प्रमुख पिके ...क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)  ज्वारी ...१८९६००  गहू ...२६७००  मका ...३४२००  हरभरा ...२८४००  करडई ...२८००  सूर्यफूल ...१२००  कांदा ... ६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com