परभणी जिल्ह्यात रब्बीत १ लाख ४० हजारांवर पीकविमा प्रस्ताव

Rabbi's proposal for crop insurance at Parbhani district at over Rs 1 lakh 40 thousand
Rabbi's proposal for crop insurance at Parbhani district at over Rs 1 lakh 40 thousand

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गंत यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ४० हजार ७२२ विमा प्रस्ताव सादर केले आहेत. या शेतकऱ्यांनी ८१ हजार ६०३.६२ हेक्टरवरील पिकांसाठी २१५ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी त्यांनी ३ कोटी २३ लाख ३२ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पीकविमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग घटला आहे. यंदा जिल्ह्यात पीकविमा योजना राबविण्यासाठी भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी ज्वारी (जिरायती व बागायती), गहू (बागायती), हरभरा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी विमा योजना लागू आहे.

जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत ज्वारी, गहू आणि हरभऱ्याची एकूण २ लाख ३९ हजार ७२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमुगाची पेरणी झालेली नाही.शेतकऱ्यांनी ८०९२०.७२ हेक्टरवरील रब्बी पिके, ६८२.८८ हेक्टरवरील उन्हाळी भुईमूग मिळून एकूण ८१ हजार ६०३.६२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

यंदा जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार १७५ हेक्टरवरील पिके विमासंरक्षणाविना आहेत. तालुकानिहाय शेतकरी सहभागाची माहिती विमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केलेली नाही, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ४ लाख १ हजार ९३९ विमा प्रस्ताव दाखल केले. तर २ लाख ४९ हजार २८ हेक्टरवरील पिकांसाठी ६१७ कोटी ७७ लाख ९४ हजार ९६६ रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. त्यासाठी त्यांनी ९ कोटी २६ लाख ६६ हजार ७६० रुपये विमा हप्ता भरला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com