Agriculture news in marathi, Rabbi's in Pune division Sowing speed is slow | Agrowon

पुणे विभागात रब्बीच्या पेरण्यांना येईना गती

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या संथ गतीने सुरू आहेत.

पुणे : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. यामुळे रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी पाच लाख ५१ हजार २८३ हेक्टर म्हणजेच अवघे ३८ टक्के पेरणी झाली आहे. येत्या काळात थंडी वाढल्यास अधिक वेगाने पेरण्या सुरू होतील, अशी शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  

पावसाच्या उघडिपीनंतर काही प्रमाणात थंडी वाढल्यानंतर पेरण्यांना सुरवात झाली होती. नगर जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका व हरभरा या पिकांच्या पेरणीस सुरवात झाली आहे. सद्यस्थितीत रब्बी ज्वारी वाढीच्या व पोटरीच्या अवस्थेत आहे. गहू, मका व हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पुणे जिल्ह्यातही रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली. ज्वारी, मका व हरभरा पिके वाढीच्या 
अवस्थेत आहे.

सोलापूरमध्ये खरीप हंगामातील तूर पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पीक परिस्थिती चांगली आहे. गेल्या आठवड्यामध्ये झालेला पाऊस ज्वारी पिकांसाठी पोषक ठरला आहे.

हरभरा पिकांची उगवण चांगली असून पिकांची पेरणी सुरू आहे. गहू पिकांची पेरणी प्रगतीपथावर आहे. मात्र, अधूनमधून होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे पेरणीमध्ये अडथळे तयार होत आहेत. त्यामुळे अजूनही पेरण्यांना फारसा वेग आलेला नाही.


इतर बातम्या
...तर विमा कंपन्यांवर  गुन्हे दाखल...पुणे : शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे वेळेत न...
आंदोलन सुरूच राहणार : संयुक्त किसान...नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात...
राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने उघडीप दिली...
परळी थर्मलमध्ये इंधनासाठी बांबूचा वापर...लातूर ः परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात...
पेप्सिकोच्या बटाटा वाणाचे  मालकी हक्क...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः केंद्र सरकारच्या...
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...