शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के पेरणी पूर्ण
सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे जवळपास उरकली आहेत. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.१३) ९५.८० टक्के झाली आहे. सर्वाधिक दुष्काळी माण तालुक्यात ४० हजार २५० हेक्टर पेरणी झाली आहे.
सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे जवळपास उरकली आहेत. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.१३) ९५.८० टक्के झाली आहे. सर्वाधिक दुष्काळी माण तालुक्यात ४० हजार २५० हेक्टर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. हरभरा आणि गहू पिकांची कामेही उरकत आली आहेत. अवेळी पावसामुळे दमदार आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पावसाचा सर्वाधिक फळ पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील रब्बी हंगामाचे दोन लाख १९ हजार ११९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख नऊ हजार ९१३ हेक्टर म्हणजेच ९५.८० टक्के पेरणी झाली. पिकांत सर्वाधिक रब्बी ज्वारीचे पेरणी झाली आहे.
रब्बी ज्वारीचे एक लाख ३९ हजार २०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ३० हजार ८०४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गहू पिकांचे ३४ हजार ९७३ हेक्टर सर्वसाधरण क्षेत्र आहे. गव्हाची ३५ हजार ६६० हेक्टर पेरणी झाली आहे. हरभरा पिकाच्या ३० हजार ४८९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी २९ हजार ७३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
मक्याचे १२ हजार १७७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्याची १२ हजार ४८४ हेक्टरवर लागवड झाली आहे.
तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)
सातारा- १७,७८२, जावळी- ७३३४, पाटण- १२,८०६, कऱ्हाड- १५,०२२, कोरेगाव- २२,३०३, खटाव- ३३,३३६, माण-४०,२५०, फलटण- २८,८५३, खंडाळा- १६,७०२, वाई- १४,७९५, महाबळेश्वर- ७४८.
- 1 of 1055
- ››