Agriculture news in marathi; Rabbit on a thousand hectares in saline belt | Agrowon

खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर ज्वारी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले उत्पादन देऊ शकते हे मागील काही हंगामात स्पष्ट झाल्याने या वेळी हे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात ज्वारीचे हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन केले जात आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून हे क्षेत्र वाढीचे काम केले जाणार आहे.

अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले उत्पादन देऊ शकते हे मागील काही हंगामात स्पष्ट झाल्याने या वेळी हे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात ज्वारीचे हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन केले जात आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून हे क्षेत्र वाढीचे काम केले जाणार आहे.

ज्वारीचे पीक हे मागील काही वर्षांत सातत्याने कमी होत गेले. जिल्ह्यात प्रामुख्याने खरिपात ज्वारीची लागवड मोठ्या क्षेत्रावर व्हायची. परंतु उत्पादकता, बाजारभाव अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी इतर पिकांना पसंती दिली. रब्बीत तर ज्वारीची फारशी लागवडच होत नव्हती. आता परिस्थिती बदलत चालली आहे. बाजारपेठेत ज्वारीला गव्हापेक्षा अधिक दर मिळत आहे. सोबतच जनावरांसाठी कडब्याची मोठी उपलब्धताही होत असते. ज्वारी पिकापासून बरेच फायदे असल्याने आणि खारपाण पट्ट्यातील जमीन रब्बी हंगामात या पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने यावर्षी रब्बी ज्वारीचे क्षेत्र हजार हेक्टरपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यावर्षी खारपाण पट्ट्यात खरिपाचे काही क्षेत्र नापेर राहिलेले आहे. तसेच काही शेतकरी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची काढणीकरून रब्बी हंगाम साधतात. हरभरा पिकासोबतच ज्वारीचे क्षेत्र वाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीचे नवीन वाण विकसित केले आहेत. रब्बीत या वाणांपासून उत्पादन अधिक मिळण्याची क्षमता असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मागील दोन-तीन रब्बी हंगामात काही शेतकऱ्यांनी ज्वारीची रब्बीत लागवड करून ज्वारी आणि चारा असे मिळून चांगले उत्पन्न मिळवले. जिल्ह्यात रब्बीत प्रामुख्याने हरभरा लागवडीकडेच शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल असतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना ज्वारीचे महत्त्व पटवून देत लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्याचे काम होत आहे.  

कृषी विभाग, कृषी विद्यापीठामार्फत शासनाच्या विविध योजनांमधून काही क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके दिली जाणार आहेत. याचे नियोजन केले जात आहे. शासनाच्या पुढाकाराने जिल्ह्याचे रब्बीतील ज्वारी क्षेत्र हजार हेक्टरपर्यंत यंदा पोचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर नियमित लागवडसुद्धा होईल. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात ज्वारी पिकासाठी योग्य परिस्थिती आहे. यावर्षी रब्बी हंगामासाठी अत्यंत चांगला पाऊस झालेला आहे. परतीच्या पावसाने रानशिवारात ओल मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे. सोबतच प्रकल्पांमध्ये साठा झालेला आहे.
 

मागील काही वर्षांचा अनुभव पाहता ज्वारीचे क्षेत्र सातत्याने घटल्याचे दिसून येते. परंतु, आता ज्वारीला बाजारभाव चांगला असून, रब्बीत इतर पिकांसोबत ज्वारीचे उत्पादन अधिक मिळू शकते. कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने रब्बीत क्षेत्रवाढीचे नियोजन करीत आहोत. एक हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र नेण्याचे प्रयत्न आहेत.
- मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला  
 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...