Agriculture news in marathi, Rabi aims to sow 2.5 lakh hectares in Pune district | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख ३५ हजार ८६८ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी झालेल्या पावसामुळे रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ५६ हजार ६८० हेक्टरवर पेरणी होण्यासाठी नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

गेल्या आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जिल्हयात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. तरीही लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्यांना सुरवात करतील. यंदा परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे खरिपातील पिकांच्या काढण्या रखडल्या होत्या. 

जिल्ह्यातील पूर्व भागातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर या भागात कांदा, कापूस, बाजरी, फळे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्तर भागातील खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटो, बटाटा, सोयाबीन, बाजरी अशा पिकांना बऱ्यापैकी फटका बसला आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली या तालुक्यात भात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उशिराने झालेल्या पावसामुळे गहू व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल. मात्र, परतीच्या पावसामुळे अजूनही काही भागात शेतात पाणी असल्याने जमिनीची ओल कमी झालेली नाही. ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, अशा भागात रब्बीच्या कामांना सुरवात झाली असून वेग आला असल्याची स्थिती आहे. गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण आहे. चालू महिन्यात या पेरण्यांना सुरवात होऊन डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या आटोपतील, अशी शक्यता आहे.


इतर बातम्या
पुसदमध्ये ५००० क्विंटल कापसाचीच खरेदीआरेगाव, जि. यवतमाळ : यंदा सुरवातीपासूनच कापसाला...
धुळे : सोयाबीन बीजोत्पादनात सहभाग...धुळे : ‘‘उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये महाबीज...
नाशिकः २०२४ पर्यंत प्रति दिन,प्रति...नाशिकः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’...
खानदेशात गहू पेरणीला आला वेग जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस काहीसे कोरडे...
नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी...नांदेड : ई-पीक पाहणी प्रकल्पातंर्गत पीक पेरा...
नांदेडमध्ये सोयाबीनला साडेसहा हजारांचा...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...
काँग्रेसचे सतेज पाटील, भाजपचे अमरिश...मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागा...
नाशिकमध्ये द्राक्ष परिषद घेणार : राजू...नाशिक : द्राक्ष पिकात शेतकरी कष्टातून उत्पादन घेत...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणीचा टक्का कमीचनगर ः जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला अजूनही फारसा...
ई-पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपुणेः देशातील पहिल्याच ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या...
किन्ही येथे धान पुंजणे जाळल्याने आठ...भंडारा ः साकोली तालुक्‍यातील किन्ही येथे १९...
पालघरचा मंजूर विकासनिधी सातव्यांदा...पालघरः मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याच्या...