agriculture news in marathi Rabi area in Dhule district will double | Agrowon

धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार दुप्पटीने वाढ

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

कापडणे, जि. धुळे : विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बीतील कोळपणी सुरू आहे. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे.

कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने सलग तीन महिने हजेरी लावली. नदीनाल्यांना पूर आले. लहानमोठ्यांसह सर्वच धरणे तुडुंब भरून ओसंडली. रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यासाठी तयारी सुरू आहे. विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्याने हरभरा आणि गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बीतील कोळपणी सुरू आहे. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. 

जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे, धुळे मध्यम प्रकल्प, मुकटी आदी प्रकल्प व धरणे तुडूंब भरले आहेत. यांचे पाणी रब्बीसाठी दिले जाते. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सध्या पहिले आवर्तन देण्यासाठी पाटबंधारे विभागाची तयारी सुरू झाल्याचे समजते. 

जिल्ह्यातील जलसाठ्यात विक्रमी जलसंचय आहे. कूपनलिका व विहिरींची पाणी पातळीही मोठी वाढली आहे. रब्बीतील गहू, हरभरा, बाजरी आणि ज्वारीच्या पेऱ्यात यावर्षी अधिकची वाढ झाली आहे. रब्बीचे क्षेत्र दुप्पटीने वाढणार आहे. 

गहू, हरभरा तरारला

कूपनलिका आणि विहिरीच्या पाण्यावरचा रब्बीचा पेरा ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाला आहे. गहू, हरभऱ्या‍ची पिके चांगलीच तरारली आहेत. थंडीमुळे जोरकस वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही सुरू केली आहेत. 

यावर्षी पाण्याचा साठा अधिक आहे. गहू आणि हरभऱ्या‍ला बऱ्यापैकी भाव असतो. हे पीक हमीची उत्पादन देते. साठवताही येते. त्यामुळे यांच्या क्षेत्रात वाढ केली आहे. 
- बन्सीलाल माळी, शेतकरी


इतर ताज्या घडामोडी
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...