पूर्वमोसमी, गारपिटीमुळे रब्बी पिकांच्या सुगीवर संकट

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात गहू भिजला. फुलांची नासाडी झाली. मोसंबीची फळगळ झाली. — बालाजी सावंत, मालेगाव, जि. नांदेड
पूर्वमोसमी, गारपिटीमुळे रब्बी पिकांच्या सुगीवर संकट
पूर्वमोसमी, गारपिटीमुळे रब्बी पिकांच्या सुगीवर संकट

नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये बुधवारी (ता. १८) रात्री ते गुरुवारी (ता. १९) पहाटेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अनेक भागांत गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिके, फळे, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. यंदाचा रब्बी हंगामात नैसर्गिक संकटामुळे हाती आलेली पिके मातीमोल होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नांदेड, हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, नायगाव, मुखेड, लोहा आदी तालुक्यातील मंडळांमध्ये वाऱ्यासह गारपीट झाला. अर्धापूर, हदगाव आदी तालुक्यांतील रब्बी पिकांसह फळपीकांना गारपिटीचा तडाखा बसला. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ,  गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील २९ मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी मंडळातील खळी व परिसर परभणी तालुक्यातील ब्रम्हपुरी, ब्राम्हणागाव, तरोडा आदी गावे पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, चुडावा आदी गावांतील संत्रा पिकांचे नुकसान झाले.   हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे भिजून नुकसान झाले. वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली. हरभऱ्याचे घाटे, गव्हाच्या ओंब्या गळून पडल्या. संत्रा, मोसंबी, पपई आदी पिकांमध्ये फळगळ झाली. टरबूज, खरबूज या वेलवर्गीय फळपिकांसह वांगी, टोमॅटो, कांदे आदी भाजीपाला पिकांचे गारपिटीने मोठे नुकसान झाले. गारपिटीत झोडपल्यामुळे गायी, बैल, म्हैस आदी जनावरे जखमी झाले. मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः नांदेड जिल्हा  ः किनवट ७, बोधडी ४, जलधारा १८,  हिमायतनगर १४, सरसम ४, जवळगाव १०, किनी ३, अर्धापूर ८, दाभड १४, मालेगाव ६, माहूर २, नांदेड शहर २, वजीराबाद ३, नरसी ३, हदगाव ८, तामा ४, मनाठा २५, पिंपरखेड ७, आष्टी ७. परभणी जिल्हा ः  परभणी शहर ३.५, परभणी ग्रामीण ३, पेडगाव ३, पिंगळी ६.५०, जांब ८.५०, पालम ५, चाटोरी ३, पूर्णा ७, ताडकळस ९, चुडावा ४, लिमला ४, कात्नेश्वर ३,महातपुरी १९, आवलगाव ७, देऊळगाव ४, चिकलठाणा ५, जिंतूर ३, सावंगी म्हाळसा ४, बोरी ५, आडगाव ३, कोल्हा ३. प्रतिक्रिया जोराच्या वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक आडवे झाले. गहू भिजल्याने दाण्याची प्रत खराब झाली आहे. — काशिनाथ सांगळे, केळी, जि. हिंगोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com