नांदेड जिल्ह्यात रब्बीत १७ टक्केच पीक कर्जवाटप

नांदेड जिल्ह्यात रब्बीत १७ टक्केच पीक कर्जवाटप
नांदेड जिल्ह्यात रब्बीत १७ टक्केच पीक कर्जवाटप

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी सोमवार (ता. १७) पर्यंत १३ हजार ८९४ शेतकऱ्यांना ७३ कोटी १४ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या १७.३८ टक्के रब्बी पीक कर्ज वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे; परंतु व्यापारी तसेच खासगी बॅंकांचे कर्ज वाटप संथ गतीने सुरू आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने खरिपामध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटप केले. परंतु रब्बी हंगामात मात्र अद्याप कर्ज वाटपास सुरवात केलेली नाही.

जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ४२० कोटी ८७ लाख रुपये एवढे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ३८ कोटी २१ लाख रुपये, व्यापारी आणि खासगी बॅंकांना ३२३ कोटी ३७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ५९ कोटी २९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. 

सोमवार (ता. १७) पर्यंत व्यापारी आणि खासगी बॅंकांनी एकूण ६ हजार ६८१ शेतकऱ्यांना ३३ कोटी ७२ लाख रुपये (१०.४३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ७ हजार २१३ शेतकऱ्यांना ३९ कोटी ४२ लाख रुपये (६६.४९ टक्के) कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मात्र अद्याप कर्ज वाटप सुरू केलेले नाही. व्यापारी आणि खासगी बॅंका; तसेच महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने एकूण १३ हजार ८९४ शेतकऱ्यांना ७३ कोटी १४ लाख रुपये (१७.३८ टक्के) कर्ज वाटप केले आहे. 

१ लाख ११ हजार ११० शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये एवढे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ११ हजार ११० शेतकऱ्यांना ६४३ कोटी ३८ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या ३८.२२ टक्के एवढेच कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १५२ कोटी ८२ लाख रुपये उद्दिष्ट असताना ५४ हजार ७४७ शेतकऱ्यांना १७९ कोटी ६४ लाख (११७.५५ टक्के) कर्ज वाटप केले. 

व्यापारी आणि खासगी बॅंकांना १ हजार २९३ कोटी ४९ लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात ३३ हजार ६०४ शेतकऱ्यांना ३२१ कोटी ५२ लाख रुपये (२४.८६ टक्के) पीक कर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २३७ कोटी १६ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २२ हजार ७५९ शेतकऱ्यांना १४२ कोटी २२ लाख रुपये (५९.९७ टक्के) पीक कर्ज वाटण्यात आले.

एकूण सव्वा लाख शेतकऱ्यांना कर्ज जिल्ह्यात यंदा खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण २ हजार १०४ कोटी ३४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सोमवार (ता. १७) पर्यंत १ लाख २५ हजार ४ शेतकऱ्यांना ७१६ कोटी ५२ लाख रुपये (३४.०५ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले. या संदर्भात सहकार विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com