अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, फळपिकांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, फळपिकांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे रब्बी पिके, फळपिकांचे नुकसान

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये सोमवारी (ता.३) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये वेगाच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवेळी झालेल्या या पावसामुळे काढणी सुरू असलेली तूर, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. रविवारी (ता.२) रात्री नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, लोहा आदी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पालम, मानवत, पाथरी आदी तालुक्यांतील १६ मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आदी तालुक्यांतील अनेक तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे काढणी सुरू असलेली तूर भिजली. निसवलेले; तसेच कणसावर असलेली ज्वारी, ओंब्यांवर असलेला गहू; तसेच हरभरा पिकांचे नुकसान झाले. मांडखळी, जांब (ता. परभणी) या गावातील संत्रा फळबागांमध्ये फळगळ झाली. फांद्या मोडल्या. झाडे मुळापासून उपटून पडल्याने संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला. आंबा मोहोराचे नुकसान झाले. पीकनुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः परभणी शहर १२, परभणी ग्रामीण ७, सिंगणापूर १, दैठणा १, पेडगाव १, पिंगळी ६, जांब ८.५०, पालम ३, चाटोरी २, बनवस ५, गंगाखेड १, राणीसावरगाव १, माखणी १६, महातपुरी २, बाभळगाव १, केकरजवळा ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com