सातारा जिल्ह्यात रब्बी पिके काढणीस वेग

Rabi crops speed up in Satara district
Rabi crops speed up in Satara district

सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिके काढणीस वेग आला आहे. हरभरा काढणी अंतिम टप्प्यांत असून रब्बी ज्वारी व गहू काढणी व मळणी करण्यात शेतकरी व्यस्त झाले आहेत. ढगाळ हवामान व पूर्व मोसमी पावसाचे वातावरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परतीचा पाऊस खरिपासाठी जरी हानिकारक ठरला असला तरी रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरला होता. यामुळे जिल्ह्यात रब्बी पेरण्याची कामे वेगात सुरू झाली होती. जिल्ह्यात ९० टक्के रब्बी पेरणीची कामे उरकली होती. यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची एक लाख १५ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर हरभरा २७ हजार ४४९ हेक्टर, गहू ३७ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. सध्या रब्बी पिकांची काढणीची कामे वेगात सुरू आहे. 

पहिल्या टप्प्यांत पेरणी झालेल्या हरभऱ्यांची काढणी अंतिम टप्प्यांत आली आहे. तसेच रब्बी ज्वारी व गहू काढणीची कामे सध्या सुरू आहेत. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १७ टक्के घटले असले तरी रब्बी ज्वारीचे पीक चांगले आहे. यामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता कमी आहे. कडब्याच्या दर तेजीत राहण्याची शक्यता असल्याने काढणी अगोदरच कडब्याचे बुकिंग केले जात आहे. पहिल्या टप्प्यांत पेरणी झालेल्या गहू पिकांची काढणीस प्रारंभ झाला आहे. 

सध्या काढणी आणि मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त झाले आहेत. गहू पिकांची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजेच १०७ टक्के पेरणी झाली असून पीकही चांगले असल्याने गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यात परतीचा दमदार पाऊस झाल्याने पाणीटंचाई भासलेली नाही. रब्बी हंगामास पुरले एवढा पाणी मिळाल्याने पिकांच्या अवस्था चांगल्या असल्याने या तालुक्यात उत्पादनात वाढ होणार आहे. 

मार्च महिन्याच्या सुरुवातीस माण, फलटण या दुष्काळी तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने फळबागाचे नुकसान झाले होते. मात्र, रब्बी पिकांच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ हवामान व काही ठिकाणी मोसमी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com