Agriculture news in marathi Rabi crops as well as turmeric losses due to rain | Agrowon

पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोमवारी (ता. ३०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. काही भागात जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये काढणी सुरू असलेली रब्बी पिके तसेच हळदीचे भिजून नुकसान झाले.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोमवारी (ता. ३०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. काही भागात जोराच्या वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतामध्ये काढणी सुरू असलेली रब्बी पिके तसेच हळदीचे भिजून नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील माहूर मंडळात ५ मिमी, वाई मंडळात २ मिमी, वानोळा मंडळात १० मिमी, सिंदखेड मंडळात ३ मिमी पाऊस झाला. किनवट तालुक्यातील दहेली मंडळात १२ मिमी पाऊस झाला. अन्य तालुक्यातील काही मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील परभणी तसेच परिसर, हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ तसेच वसमत तालुक्यात काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाला. या जिल्ह्यांमध्ये रब्बीची सुगी सुरू आहे. तसेच हळद काढणी हंगाम सुरू झाला आहे. पावसामध्ये गहू, ज्वारी, हरभरा तसेच हळद भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अधून मधून अवकाळी पाऊस सुरुच असल्यामुळे शेतामध्ये काढणी केलेला शेतमाल झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...