नांदेड जिल्ह्यात ८२ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

नांदेड जिल्ह्यात ८२ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी
नांदेड जिल्ह्यात ८२ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवारपर्यंत (ता. २६) ८२ हजार ६५७ हेक्टर म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्राच्या ६०.४६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. ज्वारी, गहू, करडईच्या क्षेत्रात यंदा मोठी घट झाली आहे, परंतु शेतकऱ्यांनी यंदाही हरभऱ्याला अधिक पसंती दिल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३३ हजार ७१२ हेक्टर आहे, परंतु यंदा दुष्काळामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रामध्ये मोठी घट झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. २६) ज्वारीची ११ हजार ३६० हेक्टरवर (४२.११ टक्के), गहू ७ हजार १० हेक्टर (१८.१९ टक्के), हरभरा ६२ हजार ७११ हेक्टरवर (१००.५८ टक्के), करडई ४४८ हेक्टर (९.०१ टक्के), तीळ ४१ हेक्टर, सूर्यफुल ७० हेक्टर, मका ९३२ हेक्टरवर पेरणी झाली होती. ज्वारी, गहू, करडई या पिकांच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

शेतकऱ्यांनी रब्बीतील नगदी पीक असलेल्या हरभऱ्याला अधिक पसंती दिल्याने जिल्ह्यातील हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या भागात, तसेच इसापूर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात हरभरा, गव्हाची पेरणी सुरू आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होऊ शकते.

शेतकऱ्यांनी यंदाही हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती दिली आहे. सिंचनाची सोय असलेल्या भागात पेरणी सुरू आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com