Agriculture news in Marathi Rabi cultivation will increase in Amravati district | Agrowon

अमरावती जिल्ह्यात रब्बी लागवड वाढणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

या वर्षी पावसाची संततधार सुरू होती. त्यासोबतच मॉन्सूनच्या कालावधीत देखील पावसाने सरासरी ओलांडली. यामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. जिल्ह्यात या वर्षी १ लाख ७७ हजार ८५२ हेक्‍टर रब्बी लागवड क्षेत्र राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

अमरावती ः या वर्षी पावसाची संततधार सुरू होती. त्यासोबतच मॉन्सूनच्या कालावधीत देखील पावसाने सरासरी ओलांडली. यामुळे जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. जिल्ह्यात या वर्षी १ लाख ७७ हजार ८५२ हेक्‍टर रब्बी लागवड क्षेत्र राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

या वर्षी खरीप पिकांना पावसाची संततधार, ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाचा फटका बसला. मूग, उडीद आधीच उद्ध्वस्त झाले. त्यानंतरच्या कालावधीत सोयाबीन, कपाशीदेखील हातची गेली. आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांकडून लागून आहेत. गेल्या तीन वर्षांत रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ३३ हजार ५४५ हेक्‍टर राहिले आहे. त्यात यंदा ३५ ते ४० हजार हेक्‍टर वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याकरिता ३५ हजार क्‍विंटल बियाणे सार्वजनिक, तर ६३७१९ क्‍विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून असे एकूण ९८,७१९ क्‍विंटल बियाणे लागणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ७८९ क्‍विंटल बियाण्यांचाच पुरवठा झाला आहे. याशिवाय ३२ हजार क्‍विंटल बियाण्यांचा पुरवठा ‘महाबीज’द्वारे होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात १,२३,००० मेट्रिक टन खताचे नियोजन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत १९,४९२ मेट्रिक टन खरिपातील खताचा साठा शिल्लक आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...