नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात दुप्पट वाढ अपेक्षित आहे. लहान-मोठ्या धरणांसह भुजलपातळीची यंदा चांगली स्थिती आहे. त्यामुळे कृषी विभागाने साडेतीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
Rabi proposed an area of ​​three and a half lakh hectares in Nanded district
Rabi proposed an area of ​​three and a half lakh hectares in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात दुप्पट वाढ अपेक्षित आहे. लहान-मोठ्या धरणांसह भुजलपातळीची यंदा चांगली स्थिती आहे. त्यामुळे कृषी विभागाने साडेतीन लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर हरभरा, ५० हजार हेक्टरवरगहू, तर तीस हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित केला आहे.

जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ४० हजार २२३ हेक्टर आहे. यात मागील काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे.यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा मुबलक आहे.

जिल्ह्यालगतच्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यात तीन लाखापेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा यात वाढ होऊन रब्बी हंगामात साडेतीन लाख ४८ हजार ८१५ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. तर गहू ४७ हजार ९२१ हेक्टर, रब्बी ज्वारी ३० हजार ९२२ हेक्टर, मका पाच हजार ९०८ हेक्टर, करडई १४ हजार २७७ हेक्टर, रब्बी तीळ ९११ हेक्टर असे एकूण तीन लाख ५० हजार ७७० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित केली आहे.

शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. खरिपातील शिल्लक खते तसेच मंजूर होणाऱ्या आवंटनामुळे खताची कमतरता पडणार नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या १३४ टक्के पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यानजीकच्या प्रकल्पांत पूर्ण पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे यावर्षी रब्बीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढेल. कृषी विभागाने बियाणे तसेच खताचे नियोजन केले आहे. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com