Agriculture news in marathi; The rabi season of Akola is likely to reach 1.5 lakh ha | Agrowon

अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही वाढीव क्षेत्र रब्बीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता असून, यंदा दीड लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकते, असा अंदाज आहे. कृषी विभागाने सुरुवातीला सव्वा लाख हेक्टरचे नियोजन केले होते. त्यात २५ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. सध्या रब्बी लागवडीला सुरुवातही झाली आहे.

अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही वाढीव क्षेत्र रब्बीमध्ये परावर्तित होण्याची शक्यता असून, यंदा दीड लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकते, असा अंदाज आहे. कृषी विभागाने सुरुवातीला सव्वा लाख हेक्टरचे नियोजन केले होते. त्यात २५ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. सध्या रब्बी लागवडीला सुरुवातही झाली आहे.

या वर्षी परतीचा पाऊस दमदार झालेला आहे. सर्वच प्रकल्प भरलेले आहेत. या वर्षी खरिपात अतिपावसाने नुकसानही झाले. ही मरगळ झटकून आता शेतकरी रब्बीकडे वळू लागला आहे. यात जमिनीत सध्या ओल अधिक असल्याने अद्यापही मशागतीचे काम जोमाने सुरू झालेले नाही. परंतु, पाऊस ओसरल्याने येत्या आठवड्यात मशागतीसह इतर लागवडीची कामे जोमाने सुरू होणार आहेत. कृषी विभागाने रब्बीचे सव्वा लाख हेक्टरचे नियोजन केले होते. त्यादृष्टीने बियाणे, खतांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली होती. आता क्षेत्रवाढीमुळे बियाणे, खते वाढीव लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे योजनांसाठी अतिरिक्त मागणी केली जाणार आहे.

अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यांत या वर्षी हरभऱ्याची लागवड अधिक राहणार आहे. पहिल्या नियोजनानुसार अकोला तालुक्यात एकूण नियोजनाच्या २६ हजार ५०० हेक्टरवर हरभरा असेल. याशिवाय अकोट तालुक्यात २० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले. सोबतच बार्शीटाकळी तालुक्यात ११ हजार, मूर्तिजापूर १३९००, तेल्हारा १३ हजार, बाळापूर ८ हजार आणि पातूरमध्ये ९६०० हेक्टरवर हरभरा लागवड अपेक्षित आहे. जिल्ह्यात गव्हाचे १८ हजार ७११ हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. अकोला तालुक्यातच सर्वाधिक ४३२९ हेक्टरवर लागवड होणार आहे. रब्बीत लागवड होणाऱ्या पिकांची वाणनिहाय बियाण्यांची मागणीसुद्धा नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्यात या वेळी मसालावर्गीय ओवा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. खारपाण पट्ट्यात ओव्याची फायदेशीर शेती होऊ लागली आहे. या वर्षी रब्बीत किमान ७०० हेक्टरवर ओव्याची पेरणी नियोजित करण्यात आली. रब्बीत कांदा तसेच कांदा बीजोत्पादन याचेही नियोजन करण्यात आले. कांद्याची सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर वाढ होऊ शकते, तर कांदा बीजोत्पादनाचे तीन हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रब्बीत १५ नोव्हेंबरपासून हरभऱ्याची लागवड वाढणार आहे.

वाफसा झालेल्या भागात हरभरा लागवड सुरू
रब्बी रासायनिक खतांचेही नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया १२ हजार मेट्रिक टन, डीएपी ८०००, एमओपी २१००, कॉम्प्लेक्स २०३००, एसएसपी ८०००, इतर ७०० असे मिळून ५१ हजार १०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली. शासनाने ४७ हजार ७१० मेट्रिक टन खतांना मंजुरी दिली आहे.    

रब्बीचे पीकनिहाय नियोजित क्षेत्र

हरभरा १०२०००
गहू  १८७११
ओवा  ७००
कांदा  ३४४४
कांदा बीजोत्पादन  ३०००
एकूण  १२७८१५    
वाढीव क्षेत्र  १५०००० हेक्टर

इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...